गोसेच्या डाव्या कालव्यालगतचे धान पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 23:54 IST2017-08-11T23:53:37+5:302017-08-11T23:54:13+5:30
विदर्भातील महत्वाकांक्षी गोसे प्रकल्प शेतकºयांना वरदान ठरणार असे स्वप्न .......

गोसेच्या डाव्या कालव्यालगतचे धान पाण्याखाली
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी/चिचाळ/आसगाव : विदर्भातील महत्वाकांक्षी गोसे प्रकल्प शेतकºयांना वरदान ठरणार असे स्वप्न पाहणाºया शेतकºयांच्या डोळ्यात प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या निर्मितीने वाहणाºया सांडपाण्याची सुलतानी अधिकाºयांनी योग्य नियोजन न केल्याने सेंद्री खु. सेंद्री बु. कोंढा व खैरी दिवाण येथील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली आली असून धान सडण्याच्या मार्गावर आहेत.
इंदिरा सागर गोसे प्रकल्पाचा मुख्य डावा कालवा सेंद्री खुर्द, सेंद्री बु., कोंढा व खैरी दि. शेत शिवारातून गेला आहे. मात्र सदर शेत शिवारातून वाहणारे ओढे व पाणी वाहून नेणारे प्रवाह डाव्या कालव्याच्या योग्य नियोजन करण्यात नाही आल्याने सदर परिसरात ८ ते १० दिवस पाणी शेतात साचून राहतो. तर कालव्याच्या कडेने पाणी वाहून नेणारी कॅलन व सदर परिसरात कालव्याचे शाखा कालवा उपशाखा कालवा वितरिका उपवितरिका असे अनेक जाळे पसरले आहेत. मात्र शेत शिवारातील वाहुन जाणारे पाण्याची नियोजन न केल्याने हे पाणी साचून राहत आहे.
गेल्या एक महिन्यापुर्वी सदर परिसरातील शेतकºयांनी व आझाद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई यांनी लेखी तोंडी सांगूनही शासनाने कानाडोळा केल्याने आता नुकत्याच येवून गेलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शेतातील कोवळी रोवळी, पºहे पाच दिवसापासून पाण्याखाली आली आहे.
आज ११ आॅगस्टला सकाळपासूनच आझाद शेतकरी संघत्तचे अध्यक्ष किशोर पंचभाई व शेतकरी संबंधित अधिकाºयांची चेतकाप्रमाणे वाट पाहत होती काही वेळाने अधिकारी येताच त्यांना घेराव टाकून हे तुमच्या नियोजनाअभावी पाणी वाहणाचा प्रवाह बंद झाला त्यांची योग्य विल्हेवाट लावा व झालेली नुकसान भरपाई द्या अभियंता वाघमारे यांनी मेकॅनिकलची मशीन शासनाकडे उपलब्ध नसून तुम्ही भाड्याने मशीन आणा आम्ही त्याचा मोबदला देवू मात्र शेतकरी ऐकण्यास तयार नव्हते तुम्ही वरिष्ठांना मौक्यावर बोलवा तरच यांचा विल्हेवाट लागेल ही भूमिका शेतकºयांनी बातमी लिहीपर्यंत घेतली होती.
यावेळी अंकोश गिरडकर, लक्ष्मण दिघोरे, सदाशिव सावरकर, शरद मोहरकर, बंडू गिरडकर, राजीराम गायधने, चंद्रलाल गायधने, अशोक नागरीकर, दिलीप नागरीकर, निलकंठ सेलोकर, दशरत वाडीभस्मे, उमेश पंचभाई, जागेश्वर वाडीभस्मे, राजु पंचभाई, जयदेव भुरे, मुरलीधर धाबेकर व सेंद्री, कोंढा, खैरी येथील शेतकरी व आझाद शेतकरी संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासनाच्या वेळकाढू धोरणाने शेतकºयांवर गेल्या कित्येक वर्षापासून ही परिस्थिती निर्माण होत आहे. सदर परिसराची चौकशी करून शेतकºयांना आर्थिक मदत द्यावी अन्यथा मोठे जनआंदोलन करण्यात येईल.
-किशोर पंचभाई, अध्यक्ष, आझाद शेतकरी संघ.