स्वच्छता अभियानांतर्गत व्याख्यानमाला

By Admin | Updated: September 5, 2016 00:45 IST2016-09-05T00:45:14+5:302016-09-05T00:45:14+5:30

ओम सत्यसाई कला व विज्ञान महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय परसोडी येथे स्वच्छता अभियान अंतर्गत व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.

Lectures under the Cleanliness campaign | स्वच्छता अभियानांतर्गत व्याख्यानमाला

स्वच्छता अभियानांतर्गत व्याख्यानमाला

समाज प्रबोधन : प्रभातफेरीतून जनजागृती
जवाहरनगर : ओम सत्यसाई कला व विज्ञान महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय परसोडी येथे स्वच्छता अभियान अंतर्गत व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य दिलीप पाटील हे होते.
यावेळी परसोडीचे सरपंच पंकज सुखदेवे, उपसरपंच दर्शन फंदे, संस्थासचिव चंद्रशेखर गिरडे, ग्रामपंचायतचे सर्व सदस्यगण यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी आमचं गाव आमचा विकास, पर्यावरण, आम्हाला झाडांची गरज आहे, पाण्याची गरज या विविध विषयांवर तसेच पानसुपारी, गुटखा न खाणे या विषयावर शाहीर ब्रम्हानंद हुमणे यांनी गद्यात्मक आणि काव्यात्मक मनोरंजनातून समाजप्रबोधन केले. गाडगे बाबांच्या स्वच्छतेचा संदेश विद्यार्थ्यांना सांगितला. वृक्षापासून मिळणारे अनेक फायदे सांगून वृक्षांची जोपासनेचे महत्व विशद केले. ग्रामस्वच्छतेविषयी गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून ग्रामस्वच्छता कशी करावी, याचा परिणाम काय होतो. याविषयी ग्रामस्थांना माहिती पटवून दिली. याप्रसंगी गावात ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. संचालन डॉ.वंदना मोटघरे यांनी केले. आभार प्रा.रुपाली रामटेके यांनी मानले. यावेळी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Lectures under the Cleanliness campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.