स्वतंत्र विदर्भ राज्य का?, यावर व्याख्यान

By Admin | Updated: August 1, 2016 00:23 IST2016-08-01T00:23:07+5:302016-08-01T00:23:07+5:30

येथील आठवले समाजकार्य महाविद्यालयात ‘स्वतंत्र विदर्भ राज्य का’? या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

Lecture on Independent Vidarbha State? | स्वतंत्र विदर्भ राज्य का?, यावर व्याख्यान

स्वतंत्र विदर्भ राज्य का?, यावर व्याख्यान

भंडारा : येथील आठवले समाजकार्य महाविद्यालयात ‘स्वतंत्र विदर्भ राज्य का’? या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप उपस्थित होते. उद्घाटक म्हणून अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रमुख अतिथी नितीन रोंघे, जिल्हा प्रभारी माजी आमदार अ‍ॅड. आनंदराव वंजारी, जिल्हा युवाध्यक्ष तुषार हटेवार, अर्जुन सुर्यवंशी, दामोदर क्षीरसागर, कार्यक्रमाचे आयोजक चंदनसिंग रोटेले, महाविद्यालयाचे संचालक केदारसिंग रोटेले उपस्थित होते. माजी आमदार अ‍ॅड वंजारी यांनी प्रास्ताविकातुन, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे शासनाच्या सिंचन योजनेप्रतीची उदासीनता जबाबदार आहे. गोसेखुर्द, बावनथडी सारखे प्रकल्प अजूनही रखडलेले आहेत. नितीन रोंघे यांनी विदभार्तील युवकांवर कशा प्रकारे नोकऱ्यांमध्ये अनुशेष व अन्याय सहन करावा लागत असल्याचे सांगितले. डॉ.श्रीनिवास खांदेवाले यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याचे होणारे फायदे, अर्थिक, भौगोलिक संपत्तिने विदर्भ हा कसा समृद्ध आहे, याबाबत माहिती दिली. अ‍ॅड. वामनराव चटप म्हणाले, राजकीय हेतूसाठी विदर्भाच्या प्रश्नांकडे कसा दुर्लक्ष केल्या जात आहे. हीच एक सुवर्ण संधी असून विदर्भाच्या लढ्यात युवकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. उद्याचे विदभार्चे नेते व धुरा युवकांच्या खांघावर राहणार आहे. 
प्राचार्य चंदनसिंग रोटेले म्हणाले, अतिशय विस्तृत अशी माहिती व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील मित्र परिवाराला जागरुक करने आवश्यक आहे. यावेळी भारत चौधरी, मयुर निंबार्ते, सारंग तिडके, राहुल बांते, आशिषकुमार मेश्राम, प्रवीण बनकर, निकेश रेहपाडे, सचिन बोंद्रे, पुजा बालपांडे, सुरेखा गायधने, रोहिणी बांगळकर, विद्यार्थी-विद्याथीर्नी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संचालन डॉ. सी. पी. मालवीय व आभार डॉ. आरती पवार यांनी मानले. विदभार्ची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Lecture on Independent Vidarbha State?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.