चांदपूर जलाशयाचा गेटला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:24 IST2021-07-21T04:24:19+5:302021-07-21T04:24:19+5:30

सध्या पावसाने दड़ी मारल्याने शेतकऱ्याना रोवणीसाठी पाणी नाही. जलाशयाचे पाणी वाहून गेले नसते तर शेतकऱ्याना पाणी उपयोगी पडले असते. ...

Leakage at the gate of Chandpur reservoir | चांदपूर जलाशयाचा गेटला गळती

चांदपूर जलाशयाचा गेटला गळती

सध्या पावसाने दड़ी मारल्याने शेतकऱ्याना रोवणीसाठी पाणी नाही. जलाशयाचे पाणी वाहून गेले नसते तर शेतकऱ्याना पाणी उपयोगी पडले असते. माजी खासदार शिशुपाल पटले यांनी मंगळवरी चांदपूर जलाशयाच्या गळती लागलेल्या मुख्य गेटला क्षेत्रातील शेतकऱ्यांसह भेट दिली. विभागाचे शाखा अभियंता डिंकवार व कुंभलकर यांना तेथे बोलावून माहिती घेतली. नंतर कार्यकारी अभियंता मानवटकर यांच्याशी मोबाईलवर चर्चा केली. गेटदुरुस्तीचे काम दोन दिवसांत सुरू न केल्यास आणि शेतकऱ्यांना रोवणीसाठी पाणी न दिल्यास भंडारा येथे कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालण्याचा इशारा इशारा त्यांनी दिली.

यावेळी किशोर राहंगडाले, मयूरध्वज गौतम, डॉ अशोक पटले, सुभाष बोरकर, अंबादास कानतोडे, भाजप तालुका महासचिव देवानंद लांजे, डॉ. मुरलीधर बानेवार, देवरी देवचे सरपंच विनोद पटले, चांदपूरचे सरपंच हेमराज लांजे, माजी सरपंच मणिक बघेले, सुकलीचे उपसरपंच सोहन पारधी, मतिन शेख, अरविंद पटले, सुनील पटले, राजकुमार पटले, अक्षय येडे, रवी बोपचे, गुड्डू राहंगडाले, डॉ. रामेश्वर शरणागत, शामराव बुद्धे, लीलाधर किरणापुरे, सुनील शिवने, आनंद रिनके, वनवास कटरे, शिशुपाल बिरणवार, संजय राहंगडाले, संतोष गौतम उपस्थित होते.

Web Title: Leakage at the gate of Chandpur reservoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.