शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

शिकारप्रकरणातील म्होरक्या गजाआड

By admin | Updated: December 30, 2016 01:37 IST

शेतशिवारात करंट लावून वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या म्होरक्याला अखेर तुमसर वनपरिक्षेत्र अधिकारी व

दोन आरोपी फरार : तुमसर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची कारवाई तुमसर : शेतशिवारात करंट लावून वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या म्होरक्याला अखेर तुमसर वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या चमूला गजाआड करण्यात यश आले. ही कारवाई आज गुरूवारला पहाटे ५ वाजता करण्यात आली. अशोक मेश्राम रा.आग्री ता.तुमसर असे या म्होरक्याचे नाव आहे. दुर्गेश रामकिसन मेश्राम, बंडू महालगावे रा.येरली फरार आरोपींची नावे आहेत. वनपरिक्षेत्र तुमसर अंतर्गत आग्री येथे वन्यप्राण्यांची शिकार झाल्याची मुदत गुप्त माहितीच्या आधारे गस्तीवर असताना वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या चमूने तात्काळ आग्री येथील विठ्ठल कवडू मेश्राम यांच्या शेतात धाड मारली असता वन्यप्राणी रानडुक्कर (नर) हा मृतावस्थेत आढळून आला. घटनास्थळी पाहणी दरम्यान वन अधिकाऱ्यांना काही ठिकाणी रक्ताचे डाग आढळून आले व त्याच ठिकाणी म्होरक्याही मिळून आला. त्याचबरोबर एक मादी चितळाचे मुंडके, पाय, कातडी व इतरही अवशेष सापडले. मात्र घटनास्थळावरून दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. या आरोपीने कुठे व किती वन्यप्राण्यांची शिकार केल्या व कसे याचा तपास उपवनसंरक्षक उमेश वर्मा, सहाय्यक वनसंरक्षक पी.डी. कोडापे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे. सदर कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी ए.आर. जोशी, क्षेत्र सहाय्यक ए.डी. राऊत, वाय.टी. रहांगडाले, व्ही.एस. किंदर्ले, एस.एस. मेश्राम, वाहन चालक गोपाल बांडेबुचे, वनमजूर कर्मचाऱ्यांनी केली. (शहर प्रतिनिधी) घटनास्थळावरून दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र आमची चमू त्यांच्या मागावर असून लवकरच त्यांना पकडण्यात येईल. - ए.आर. जोशी, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग, तुमसर.