शिकारप्रकरणातील म्होरक्या गजाआड

By Admin | Updated: December 30, 2016 01:37 IST2016-12-30T01:37:59+5:302016-12-30T01:37:59+5:30

शेतशिवारात करंट लावून वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या म्होरक्याला अखेर तुमसर वनपरिक्षेत्र अधिकारी व

The leader of the hunting system, Ghazaad | शिकारप्रकरणातील म्होरक्या गजाआड

शिकारप्रकरणातील म्होरक्या गजाआड

दोन आरोपी फरार : तुमसर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची कारवाई
तुमसर : शेतशिवारात करंट लावून वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या म्होरक्याला अखेर तुमसर वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या चमूला गजाआड करण्यात यश आले.
ही कारवाई आज गुरूवारला पहाटे ५ वाजता करण्यात आली. अशोक मेश्राम रा.आग्री ता.तुमसर असे या म्होरक्याचे नाव आहे. दुर्गेश रामकिसन मेश्राम, बंडू महालगावे रा.येरली फरार आरोपींची नावे आहेत.
वनपरिक्षेत्र तुमसर अंतर्गत आग्री येथे वन्यप्राण्यांची शिकार झाल्याची मुदत गुप्त माहितीच्या आधारे गस्तीवर असताना वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या चमूने तात्काळ आग्री येथील विठ्ठल कवडू मेश्राम यांच्या शेतात धाड मारली असता वन्यप्राणी रानडुक्कर (नर) हा मृतावस्थेत आढळून आला. घटनास्थळी पाहणी दरम्यान वन अधिकाऱ्यांना काही ठिकाणी रक्ताचे डाग आढळून आले व त्याच ठिकाणी म्होरक्याही मिळून आला. त्याचबरोबर एक मादी चितळाचे मुंडके, पाय, कातडी व इतरही अवशेष सापडले. मात्र घटनास्थळावरून दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले.
या आरोपीने कुठे व किती वन्यप्राण्यांची शिकार केल्या व कसे याचा तपास उपवनसंरक्षक उमेश वर्मा, सहाय्यक वनसंरक्षक पी.डी. कोडापे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे. सदर कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी ए.आर. जोशी, क्षेत्र सहाय्यक ए.डी. राऊत, वाय.टी. रहांगडाले, व्ही.एस. किंदर्ले, एस.एस. मेश्राम, वाहन चालक गोपाल बांडेबुचे, वनमजूर कर्मचाऱ्यांनी केली. (शहर प्रतिनिधी)

घटनास्थळावरून दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र आमची चमू त्यांच्या मागावर असून लवकरच त्यांना पकडण्यात येईल.
- ए.आर. जोशी,
वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग, तुमसर.

Web Title: The leader of the hunting system, Ghazaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.