लाखांदूरात देशी दारू अड्ड्यावर एलसीबीची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:26 IST2021-06-01T04:26:41+5:302021-06-01T04:26:41+5:30

एका पानटपरीतून अवैधरित्या देशी दारू विक्रीची करीत असल्याची गोपनीय माहिती भंडारा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. त्यानुसार भंडारा ...

LCB raids indigenous liquor den in Lakhandur | लाखांदूरात देशी दारू अड्ड्यावर एलसीबीची धाड

लाखांदूरात देशी दारू अड्ड्यावर एलसीबीची धाड

एका पानटपरीतून अवैधरित्या देशी दारू विक्रीची करीत असल्याची गोपनीय माहिती भंडारा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. त्यानुसार भंडारा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र रेवतकर, पोलीस हवालदार धर्मेंद्र बोरकर, पोलीस नाईक राजू दोनोडे, पोलीस अंमलदार पंकज भित्रे, सतीश देशमुख आदी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी अवैध देशी दारू अड्ड्यांवर छापा मारला. आरोपी ४०० नग देशी दारूचे ९० मिली क्षमतेचे टिल्लू विक्री करीत असताना रंगेहाथ पकडला गेला. यावेळी पोलिसांनी १२ हजार रुपयांचा अवैध देशी दारूसाठा जप्त करीत आरोपी विरोधात लाखांदूर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. प्रकरणाचा तपास लाखांदूरचे ठाणेदार मनोहर कोरेट्टी यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक गोपाल कोसरे करीत आहेत.

Web Title: LCB raids indigenous liquor den in Lakhandur