माडगी भगवान नृसिंह पावनधामवर यात्रेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 22:06 IST2018-12-04T22:05:59+5:302018-12-04T22:06:15+5:30
मोहाडी-तुमसर तालुक्याच्या सिमेवर गोंदिया राज्यमार्गावरील वैनगंगेच्या पवित्र पात्रात वसलेल्या प्रभू नृसिंहांच्या पावनधाम तिर्थक्षेत्र माडगी येथे यात्रेला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात हे तिर्थक्षेत्र मीनी पंढरी व विदर्भाची काशी म्हणूनही ओळखले जाते.

माडगी भगवान नृसिंह पावनधामवर यात्रेचा शुभारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : मोहाडी-तुमसर तालुक्याच्या सिमेवर गोंदिया राज्यमार्गावरील वैनगंगेच्या पवित्र पात्रात वसलेल्या प्रभू नृसिंहांच्या पावनधाम तिर्थक्षेत्र माडगी येथे यात्रेला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात हे तिर्थक्षेत्र मीनी पंढरी व विदर्भाची काशी म्हणूनही ओळखले जाते. यात्रेला विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीगढ राज्यातील हजारो भाविकांची उपस्थिती लाभली असून वैनगंगेच्या निर्मल, पवित्र पाण्यात स्नान करून पूजन अर्चना केली आहे.
कार्तिक पौर्णिमेनंतर अमावस्यापासून दरवर्षी १५ दिवसाची मोठी यात्रा नदीच्या खुल्या पात्रात भरत असते. यात्रेला प्रारंभ झाल्याने भक्तांचा लोंढा माडगी व देव्हाडाकडे वळत आहे. हजारो भाविकांनी या तिर्थक्षेत्रात गर्दी केली असून अनेकांनी वैनगंगेचे निर्मळ पाण्याने स्नान केले आहे. तुमसर-गोंदिया मार्गावरील माडगी येथे वैनगंगेच्या कुशीत मोठ्या दगडाच्या टेकडीवर पांढरेशुभ्र नृसिंहाचे मंदिर आहे.
या ऐतिहासिक मंदिरात दोन मूर्ती आहेत. एक रौद्र रूप तर दुसरी साधी भोळी प्रतिकृतीची आहे. येथील मंदिराविषयी एक अख्यायिका पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. भगवान विष्णू नृसिंह अवतरात खांबातून प्रकट झाले व हिरण्यकश्यपाच्या पोटात आपली तीक्ष्ण नखे खुपसून, आपल्या मांडीवर मांडून वध केला. हे नृसिंहाचे रूप उग्र स्वरूपाच्या मुर्तीतून प्रतिबिंबीत होते.
जवळच्या दरवाज्यातून सरळ आत गेल्यास तळघरासारखा भास होतो. तेथे हनुमंताची मूर्ती आहे. त्याच कोपऱ्यात हवनकुंड आहे. काही पायºया चढल्यास दरवाज्यावर उभे असता कृष्ण भगवानाची पाच फुट उंच विशाल मूर्ती दिसते. मूर्तीजवळ खिडकीतून भगवंताच्या मुर्तीवर सूर्य प्रकाश पडून मूर्ती विलोभनीय दिसते. हा मंदिराचा सर्वात उंच भाग आहे. राजयोगी अण्णाजी महाराज, सदगुरू योगीराज स्वामी, सितारामदास महाराजाच्या आदेशावरून राजयोगी अण्णाजी महाराज नृसिंह टेकडी माडगीला सन १९२८ साली आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांशी त्यांची जवळी होती. त्यांनी माडगी येथील नृसिंह टेकडी माडगीला सन १९२८ साली आले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांशी त्यांची जवळी होती. त्यांनी मागडी येथील नृसिंह टेकडीवरील तपश्चर्या, उपासना, योगाभ्यास साधना, ध्यान साधना, प्रवचन तसेच अनेक शास्त्रांचा अभ्यास केला. पुराणातील दाखले देवून भाविक भक्तांना शंकेचे निराकरण केले.