‘रोपे आपल्या दारी’ योजनेचा शुभारंभ

By Admin | Updated: June 27, 2017 00:33 IST2017-06-27T00:33:04+5:302017-06-27T00:33:04+5:30

कांद्री वनविभागांतर्गत शासनाच्या चार कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत रोपे आपल्या दारु या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

Launch of 'Seedlings Your Dari' Scheme | ‘रोपे आपल्या दारी’ योजनेचा शुभारंभ

‘रोपे आपल्या दारी’ योजनेचा शुभारंभ

कांद्री वनविभाग : चरण वाघमारे यांनी केले वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : कांद्री वनविभागांतर्गत शासनाच्या चार कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत रोपे आपल्या दारु या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तहसील कार्यालय मोहाडीच्या प्रांगणात पार पडलेल्या कार्यक्रमाला आमदार चरण वाघमारे यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते रोपे वितरीत करण्यात आली.
कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती हरिश्चंद्र बंधाटे, उपसभापती विलास गौपाले, पं.स. सदस्य जगदीश उके, भारत टेकाम, उमेश पाटील, किरण भैरम, निता झंझाड, निशा कळंबे, पुष्पा भुरे, वनपरिक्षेत्राधिकारी चकोले, क्षेत्र सहाय्यक एम.एम. धकाते, एच.एस. पठाण, आर.टी. मेश्राम, वाय.ए. बावनथडे, गालीवार व सर्व वनरक्षक, वनमजूर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
रोपे आपल्या दारु या योजनेअंतर्गत वनविभागाच्या कांद्री वनक्षेत्राच्या हद्दीतील नागरिकांना एका फोनवर रोपे घरपोच मिळणार आहेत. या रोपाची किंमत अल्प प्रमाणात सहा रुपये ते ११ पर्यंत ठेवण्यात आली आहे. खैर, काशिद, शिरस, आॅस्ट्रेलियन बाभूळ, करंजी, काठसादर, चिंच, आवळा, सीताफळ, जांभुळ, कवट, बेहडा, चारोळी यांचे रोपेही सहा रुपयाप्रमाणे मिळणार आहेत. गुलमोहर, अंमलनरु, रेन्ट्री सात रुपये प्रमाणे तर शिवण, बांबू, सागवान यांची रोपे ११ रुपये प्रमाणे मिळणार आहेत. या रोपांची स्टॉल तहसील कार्यालय मोहाडी येथे ३० जूनपर्यंत लावण्यात आलेले आहेत. शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेला यशस्वी करण्यासाठी हातभार लावावा व पर्यावरणाचे रक्षण करावे असे प्रतिपादन आ.चरण वाघमारे यांनी केले.

Web Title: Launch of 'Seedlings Your Dari' Scheme