जिल्ह्यात न्यूमाेकाेकल लसीकरणाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:40 IST2021-07-14T04:40:40+5:302021-07-14T04:40:40+5:30
भंडारा : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार न्यूमाेकाेकल आजारापासून बालकांना सुरक्षित ठेवण्याकरिता जिल्ह्यामध्ये न्यूमाेकाेकल काॅन्जुगेट व्हॅक्सिन या लसीकरण ...

जिल्ह्यात न्यूमाेकाेकल लसीकरणाचा शुभारंभ
भंडारा : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार न्यूमाेकाेकल आजारापासून बालकांना सुरक्षित ठेवण्याकरिता जिल्ह्यामध्ये न्यूमाेकाेकल काॅन्जुगेट व्हॅक्सिन या लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. प्राथमिक आराेग्य केंद्र माेहदुरा अंतर्गत उपकेंद्र गणेशपूर येथे जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी मंचावर उद्घाटक म्हणून भंडारा पंचायत समितीच्या माजी उपसभापती वर्षा साकुरे, गणेशपूरचे सरपंच मनीष गणविर, जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. प्रशांत उईके, जिल्हा माता बालसंगाेपन अधिकारी डाॅ. माधुरी माथुरकर, धनराज मेहर, यशवंत साकुरे, बाळु साकुरे, तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. मिलिंद माेटघरे, डाॅ. कविता कविश्वर, डाॅ. लांजेवार, विस्तार अधिकारी बिलवणे, देवानंद नागदेवे, शेषमंगल नान्ने आदी उपस्थित हाेते. न्यूमाेकाेकल आजार व लसीकरणाबाबद डाॅ. माधुरी माथुरकर यांनी सविस्तर माहिती दिली तसेच जिल्ह्यात १२८ ठिकाणी नियमित लसीकरणासाेबतच न्यूमाेकाेकल लसीकरणाला सुरुवात करण्यात आली असल्याचेही सांगितले. संचालन व आभार जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी चंद्रमणी मेश्राम यांनी केले.