तुमसरला कारगिल स्मारकाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 21:19 IST
येथील माकडे नगरात निर्मित कारगिल स्मारकाचे निर्माण कारगिल युद्धात ४० दिवस लढा देणारे मुस्लिम समाजाचे राजीक शेख नामक जवानाच्या पुढाकाराने कारगिल स्मारकाचे निर्माण २६ जुलै कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून लोकार्पण करण्यात आले.
तुमसरला कारगिल स्मारकाचे लोकार्पण
<p>लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : येथील माकडे नगरात निर्मित कारगिल स्मारकाचे निर्माण कारगिल युद्धात ४० दिवस लढा देणारे मुस्लिम समाजाचे राजीक शेख नामक जवानाच्या पुढाकाराने कारगिल स्मारकाचे निर्माण २६ जुलै कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून लोकार्पण करण्यात आले.तुमसर शहरातील माकडे नगरातील एका मुस्लिम समाजाच्या राजीक शेख जवान हा सैन्यामध्ये होता. कारगिल युद्धाच्या वेळी राजीक शेख याने ६० दिवस चाललेल्या कारगिल युद्धात स्वत: सहभागी होत ४० दिवस युद्धात भाग घेत युद्ध लढले. यात त्याला पाच वेळा जखमी व्हावे लागले. ४० दिवसानंतर त्याला गंभीर जखमी झाल्यावर दवाखान्यात हलविण्यात आले. त्या कारगिल युद्धाच्या आठवणी स्मरणात राहाव्या म्हणून त्याने २००८ ला रिटायर्ड होवून राजीक आपल्या मुळ गावी तुमसरला परतला. परंतु त्याचे मन मात्र लागत नव्हते. अशातच त्याच्या मनात एक कल्पना आली. त्याने माकडे नगरातील एका चौरस्त्याच्या बाजूलाच मागील दोन तीन वर्षापासून स्वत: मेहनत व स्वत:चा पैसा खर्च करून कारगिल मध्ये शहिदांच्या स्मृती जोपासाव्या व आपण लढलेले कारगील युद्ध नेहमी स्मरणात राहाव्या, यासाठी त्याने प्रयत्न सुरु केले. घरासमोरील चौकात कारगिल युद्धात सहभागी बोफोर्स तोफांना एक सुंदरता असा स्मारक स्वखर्चानेच तयार केला. स्वत: 'राजीक के हुबेहुब बोफोर्स तोफा'चे स्मारक तयार करून त्यांनी सुशोभीकरण केले. गुरुवारला तुमसरचे ठाणेदार मनोज सिडाम यांच्या हस्ते नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा करण्यात आला. यावेळी मोहम्मद तारीक कुरैशी, माजी नगराध्यक्ष अरविंद कारेमोरे, माजी नगरसेवक सुनिल लांजेवार, शोभा लांजेवार, नगरसेवक अमरनाथ रगडे, सीमा भुरे, राजीक शेख, आनंद बिसने आदी प्रामुख्याने उपस्थित होते.