बाल आरोग्य अभियानाचा शुभारंभ
By Admin | Updated: April 11, 2015 00:39 IST2015-04-11T00:39:19+5:302015-04-11T00:39:19+5:30
सार्वजनिक आरोग्य विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र सावरला यांच्या विद्यमाने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून बाल आरोग्य अभियानाचा शुभारंभ प्राथमिक आरोग्य केंद्र सावरला येथे करण्यात आला.

बाल आरोग्य अभियानाचा शुभारंभ
तज्ज्ञांचे मार्गदर्शन : योजना पोहोचविण्याचे आवाहन
पवनी : सार्वजनिक आरोग्य विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र सावरला यांच्या विद्यमाने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून बाल आरोग्य अभियानाचा शुभारंभ प्राथमिक आरोग्य केंद्र सावरला येथे करण्यात आला.
बाल आरोग्य अभियान कार्यक्रमामध्ये तालूका आरोग्य अधिकारी डॉ. विकास मेश्राम यांनी बाळाच्या आरोग्या विषयी घ्यावयाची काळजी, बाळाचे पोषण, आरोग्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवाबाबद मार्गदर्शन केले. महाराष्ट्र शासनाद्वारे दिलेले घोषवाक्य सुदृढ बालक, सशक्त युवक, संपन्न महाराष्ट्र घडविण्यास सहकार्य करावे. तसेच ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिनाचे महत्व समजावून सांगितले व जागतिक आरोग्य संघटनेने दिलेले घोषवाक्य अन्न ठेवूया सुरक्षित शेतापासून ताटापर्यंत या बाबत जनतेला आवाहन केले.
कार्यक्रमाला सरपंच प्रभाकर भोवते, श्रीधर कुर्झेकर, वैद्यकिय अधिकारी डॉ. अजय बुजाडे, डॉ. संदिप येळमे, देवराम लुचे, चंद्रमणी मेश्राम, के. जे. सोमकुंवर, प्रदीप खोत, सुधिर मेश्राम, एस.यु. धुर्वे, के. पी जाधव, प्रतिभा भुरे, दिपाली पडोळे, प्रणाली ढवळे, औषधी निर्माता वाय. एन. देवगडे व परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता आरोग्य सेविका एम. के. सुपारे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रणीता येळणे, मनोहर बन्सोड, उमेश कोल्हे, अनिल सोनकुसरे, उरकूडा सेलोकर, होमराज भाजीपाले, दिक्षा राऊत, पार्वता बावणे यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)