अखेर उपाशी गावकऱ्यांना मिळाले धान्य

By Admin | Updated: May 22, 2017 00:45 IST2017-05-22T00:45:39+5:302017-05-22T00:45:39+5:30

धान्यासाठी धडपडणारे गावकरी उपाशी.. ही बातमी झळकताच आज मोरगाव येथे गावकऱ्यांना सरकारी

Lastly, the hungry villagers got grains | अखेर उपाशी गावकऱ्यांना मिळाले धान्य

अखेर उपाशी गावकऱ्यांना मिळाले धान्य

गावकऱ्यांच्या चेहऱ्यांवर हास्य : ‘लोकमत’चे मानले आभार
राजू बांते ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : धान्यासाठी धडपडणारे गावकरी उपाशी.. ही बातमी झळकताच आज मोरगाव येथे गावकऱ्यांना सरकारी स्वस्त धान्याचे वाटप करण्यात आले. गावकऱ्यांना धान्य मिळाल्याचे आनंद चेहऱ्यावर दिसून येत होते. ‘लोकमत’ पाठीशी उभा राहल्याने उपाशी असलेल्या गावकऱ्यांना धान्य मिळाले असल्याची गावकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करून ‘लोकमत’चे आभार मानले.
मोरगाव येथील गावकऱ्यांना सरकारी स्वस्त धान्य दुकानातून मार्च महिन्यापासून धान्य वाटप झाले नाही. स्वस्त धान्य दुकानदारांनी केलेला घोळ कारणीभूत होता. वाटप रजिस्टरमध्ये बऱ्याच शंकास्पद भानगडी निर्माण केल्या गेल्याने मोरगावच्या गरीब व सामान्य परिवारांना मार्च महिन्यापासून धान्यापासून वंचित रहावे लागले होते. मोरगावचे सरकारी स्वस्त धान्य परवानाधारक मनिषा रामटेके यांनी दारिद्रय रेषेखालील कुटुंबाचे बनावट नावे दाखवून धान्याची उचल केली. काहींचे नावे बीपीएलमध्ये असतानी त्यांचे नावे गाळली. अंत्योदय कार्डामध्येही बारा भानगडी करून गावकऱ्यांचे धान्य खुल्या बाजारात विकले जात होते व गावकऱ्यांना धान्यापासून वंचित ठेवले जात होते, असा आरोप गावकऱ्यांनी केला.
परवानाधारकाविरूद्ध लढा पुकारला. चौकशी लागली. पण, डी. वन कोणता ग्राह्य धरायचा या प्रश्नामुळे भ्रमंती झालेले प्रशासन संकटात सापडले. गावकऱ्यांनी डी वन वर आक्षेप घेतला होता. त्यामुळे धान्य वाटपाची प्रक्रिया बंद पडली होती. तालुका प्रशासनालाही याची फिकीर नव्हती. त्यामुळे मार्च पासूनचे धान्य गरीब लोकांपर्यंत पोहचले नाही. गावकऱ्यांनी समझदारी घेवून धान्य वाटप करा यासंबंधी १६ मे रोजी तहसिलदार यांना पत्र दिले. तरीही प्रशासनाची झोप उघडली नव्हती. अखेर लोकमतने धान्यासाठी धडपडणारे गावकरी उपाशी, तीन महिन्याचे धान्य गोदामात पडून हे वृत्त प्रसिद्ध केले.
त्यानंतर तहसिलदार नवनाथ कातकडे यांनी धान्य वाटपाचे निर्देश मोहाडी येथील दुकानदाराला दिले. तत्पूर्वी, प्रस्तुत प्रतिनिधी तहसिलदार यांच्याशी गरीब जनतेला धान्य देण्यासंबंधी संवाद साधला होता. त्याचा व बातमीचा परिणाम म्हणून आज सकाळपासून मोरगाव येथे श्री गणेश हातमाग सोसायटी मोहाडीचे संचालक राजू बावणे यांनी धान्याचे वाटप करणे सुरू केले.
सकाळी गावकरी रोजगार हमी योजनेच्या कामावर गेले होते. त्यामुळे केवळ नऊ लोकांनी धान्य घेतले. दुपारी १.३० नंतर पुन्हा धान्य वाटपाचे काम सुरू झाले. गहू, तांदूळ, साखर यांचे वाटप करणे सुरू होते. बातमी लिहीपर्यंत एकूण ६५ शिधा पत्रिकाधारकांना धान्य, साखरेचे वाटप करण्यात आले होते. ज्यांच्याकडे शिधापत्रिका नव्हती यांना धान्य देण्याचे अडविण्यात आले होते पण तहसिलदार नवनाथ कातकेडे यांनी समजूतदारपणा घेवून सर्वच स्तरातील जनतेला धान्य देण्याचे निर्देश दिले.
मोरगाव येथील सहदेव हारगुळे यांच्या घरी धान्य वाटपाचे काम सुरू होते. तीन महिन्यानंतर हक्काचा धान्य, साखर शिधापत्रिका धारकांना मिळत होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यांवर हास्य उमलत होते. लोक समाधान व्यक्त करीत होते. लोकमतने आमच्या लढ्यात योगदान देत असल्याचे गावकरी विसरले नाही. आता यापूढे दुकानदाराला शिक्षा व्हावी. आम्हाला न्याय मिळावा ज्यांना शिधापत्रिका नाहित अशांना कार्ड मिळावे, अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली.

Web Title: Lastly, the hungry villagers got grains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.