धानोरी शाळेला अखेर शिक्षक मिळाले

By Admin | Updated: August 6, 2016 00:32 IST2016-08-06T00:32:07+5:302016-08-06T00:32:07+5:30

धानोरी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत दोन पदवीधर शिक्षकांची पद रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते.

At last, the teacher got the teacher in the Dhanori school | धानोरी शाळेला अखेर शिक्षक मिळाले

धानोरी शाळेला अखेर शिक्षक मिळाले

लेखी आश्वासन : दोन शिक्षकांची तात्पुरती नियुक्ती
पवनी : धानोरी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत दोन पदवीधर शिक्षकांची पद रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. शिक्षक मिळावेत यासंबंधाने शाळा समिती व ग्रामस्थानी २५ जून व ५ जूनला खंड विकास अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देखील दिले. तब्ब्ल दोन महिन्यानंतर या शाळेला शिक्षक मिळाले आहे.
शिक्षण समिती व ग्रामस्थांनी खंड विकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवून ४ आॅगस्टपर्यंत शिक्षक न पाठविल्यास ५ आॅगस्टला शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार ५ आॅगस्टला सर्व शिक्षण समिती सदस्य व ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकणार एवढ्यात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व केंद्र प्रमुख यांनी शाळेला भेट दिली आणि शाळेला कुलूप न लावण्यासंबंधी त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. शिक्षण समिती सदस्य तथा ग्रामस्थांनी कायमस्वरूपी दोन शिक्षक शाळेला देण्यात यावे व पुन्हा त्यांना दुसरीकडे हलविण्यात येऊ नये, असा आग्रह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व केंद्र प्रमुख यांच्याकडे धरला. ग्रामस्थांची दखल पं.स., जि.प. सदस्यांनी तसेच केंद्र प्रमुखांनी घेवून दोन पदवीधर शिक्षक तात्काळ देण्याचे आश्वासन दिले. यानंतर दुरीकडे हलविण्यात येणार नाही, असे केंद्र प्रमुख यांनी खंडविकास अधिकाऱ्यांच्या वतीने लेखी आश्वासन दिले. एस.आर. राठोड व कुमारी आर.जी. हाके यांना येथील शाळेत पाठविण्यात आले. शाळेला दोन नवीन शिक्षक येईपर्यंत वरिष्ठ दोन्ही शिक्षक याच शाळेत राहणार. नवीन शिक्षक आल्यानंतर त्यांना त्यांच्या पुर्ववत जागेवर पाठविण्यात येईल, असे लेखी आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आल्यामुळे शाळेला कुलूप ठोकण्यात आले नाही.
यावेळी जि.प. सदस्य मनोरमा जांभूळे, पं.स. सदस्य बंडू ढेंगरे, मुन्ना तिघरे, सरपंच नामदेव वाघधरे, उपसरपंच रिना मेश्राम, गिता सतीबावने, सुनिता मंडपे, नरेश जुमळे, नरेश नान्हे, विनायक घुटके, लता शिंदे, ईश्वर तिघरे, संजीव शेंडे, जासूदा मंडपे, रायभान तिघरे, विश्रांती घुटके, निराया शेंडे, गिता सतीबावने, सुनिता मंडपे, नामदेव वाघधरे तथा ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: At last, the teacher got the teacher in the Dhanori school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.