सहा महिन्यात ३० लाखांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2016 00:26 IST2016-09-20T00:26:34+5:302016-09-20T00:26:34+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ मार्च ते ३१ आॅगस्ट २०१६ या सहा महिन्यात हातभट्टी दारु व अवैध देशी, विदेशी दारू विरोधात...

सहा महिन्यात ३० लाखांची दारू जप्त
३५४ आरोपींना अटक : उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
भंडारा : राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ मार्च ते ३१ आॅगस्ट २०१६ या सहा महिन्यात हातभट्टी दारु व अवैध देशी, विदेशी दारू विरोधात मोठया प्रमाणात कारवाई करण्यात आली. ४४६ गुन्ह्यात ३५४ आरोपींना अटक करून ३० लाख १७ हजार ७९० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सुरेंद्र मनपिया यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
या कारवाईत ७०४२ लिटर हातभट्टी दारू, ३१५ लिटर देशी दारू, १० लिटर विदेश दारु, ८९,४२० लिटर मोहा सडवा व ८ दुचाकी वाहन आदी मिळून ३० लाख १७ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आला. १ ते १६ सप्टेंबर या कालावधीत उत्पादन शुल्क विभागाने ४१ गुन्ह्यांची नोंद करून २५ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत २२३ लिटर हातभट्टी दारु, ३९ लिटर देशी दारू, ३ लिटर विदेशी दारु व ९,७१० लिटर मोहासडवा असा २ लाख ५५ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्ह्यातून हातभट्टी दारु, अवैध देशी, विदेशी दारु व परराज्यातून या जिल्ह्यात येणाऱ्या अवैध दारूचे उच्चाटन करण्याकरीता या विभागाने धाडसत्र सुरु केले आहे. ही कारवाई निरीक्षक एस.एम. राऊत, बी. डी. पटले, उरकुडे, बोलघने, बोडेवार, सहाय्यक निरीक्षक सोनलवार, उईनवार, कोटांगळे व जवान अंबुले, कोवे, सिंदपुरे, विरणवारे, कांबळे, राऊत, बावनकुळे, हरिणखेडे, जनबंधु, माटे, लांबट, ढेंगे, श्रीरंग व गिऱ्हेपुंजे यांनी केली. (नगर प्रतिनिधी)
हातभट्टी दारु किंवा अवैध मद्य तसेच परराष्ट्रातील मद्याबाबत माहिती देण्याकरीता व परिसरात अवैध दारूबाबत गुन्हा घडत असेल तर त्याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे करावी.
- सुरेंद्र मनपिया, अधीक्षक,
राज्य उत्पादन शुल्क विभाग भंडारा.