ऊस गुऱ्हाळाला अखेरची घरघर

By Admin | Updated: January 20, 2015 22:32 IST2015-01-20T22:32:41+5:302015-01-20T22:32:41+5:30

तुमसर तालुक्यातील सुमारे २५ ते ३० ऊस गुऱ्हाळ ना नफा केवळ तोटा या तत्वावर सध्या सुरू आहेत. खर्च वजा जाता गुऱ्हाळदारांना तोटा सहन करावा लागत असून

The last house of sugarcane growling | ऊस गुऱ्हाळाला अखेरची घरघर

ऊस गुऱ्हाळाला अखेरची घरघर

मोहन भोयर - तुमसर
तुमसर तालुक्यातील सुमारे २५ ते ३० ऊस गुऱ्हाळ ना नफा केवळ तोटा या तत्वावर सध्या सुरू आहेत. खर्च वजा जाता गुऱ्हाळदारांना तोटा सहन करावा लागत असून या गुऱ्हाळांना अखेरची घरघर लागली आहे.
सध्या ऊसाचे दर १७०० ते १८०० रूपये आहे. ऊस तोडणी करणे ३०० रूपये खर्च येतो. गुऱ्हाळापर्यंत आणण्याकरिता १५० ते २०० रूपये, गूळ तयार करून बाजारपेठेत नेण्याकरिता १०० रूपये खर्च पकडला तर २२०० ते २३०० रूपये खर्च अपेक्षित आहे. सध्या गूळाला बाजारपेठेत २२०० ते २३०० रूपये खर्च अपेक्षित आहे. सध्या गूळाला बाजारपेठेत २२०० ते २३०० रूपये प्रति क्विंटल भाव आहे. त्यामुळे ना नफा केवळ तोटा या तत्वावर गुऱ्हाळ उद्योग सुरू आहे.
एक गुऱ्हाळ तयार करण्याकरिता सुमारे साडेचार लक्ष रूपये खर्च करावे लागतात. मध्यम गुऱ्हाळ केंद्रावर किमान चार ते पाच पुरूष मजूर प्रति पुरूष मजूरी ३५० रूपये तर १० ते १२ महिला मजूर प्रति महिला मजूरी ११० रूपये इतकी आहे. वीज बिल एका महिन्याला ५ ते ६ हजार इतका येतो. एका दिवसात चार ते पाच क्विंटल इतके गूळ तयार करण्यात येते. गुऱ्हाळापर्यंत ऊस तोडणी करून ट्रक्टरने आणणे, ऊस तोडणी असे किचकट कामे आहेत. वीज बिल उद्योगाचे द्यावे लागते. परिश्रम अधिक करावे लागतात.
बाजारपेठेत सध्या गुळाचा भाव २२०० ते २३०० रूपये इतके अल्प असल्याने ढोरवाडा येथील गुऱ्हाळ व्यवसायाची गजानन बुधे व बाळु बुद्धे यांनी गुऱ्हाळ उद्योग पुढील महिन्यापासून बंद करणार असल्याचे सांगितले. गूळाची किंमत कमी असल्याने त्याचा फायदा सामान्य ग्राहकांना कमी व व्यापाऱ्यांना जास्त आहे. या परिसरात नगदी पीक ऊसाची पेरणी कमी करण्यात आली आहे. ऊसाला सुद्धा भाव नाही, अशी ओरड शेतकऱ्यांची आहे. ऊसाला पाणी भरपूर लागते. अल्प पर्जन्यमान व भारनियमनाचा फटका ऊस पिकाला सुद्धा बसत आहे. ढोरवाडा येथे सहा ऊसाचे गुऱ्हाळ असून तुमसर तालुक्यात सुमारे २५ ते ३० ऊस गुऱ्हाळ आहेत. सर्वांची तक्रारी सारख्या आहेत. गुळाचा गोडवा वाढावा व पारंपारिक गुऱ्हाळ सुरू राहावे, याकरिता राज्य शासनाने दखल घेण्याची मागणी गुऱ्हाळदारांनी केली आहे.

Web Title: The last house of sugarcane growling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.