डॉ.आंबेडकर वॉर्डातील उद्यानाला लागली अखेरची घरघर

By Admin | Updated: May 8, 2014 01:30 IST2014-05-08T01:30:52+5:302014-05-08T01:30:52+5:30

नागरिकांची एकजूट ही बाब कुठल्याही प्रशासनासाठी एक मोठे आव्हान ठरत असते. वारंवार निवंती करूनही नगर प्रशासन बगिच्याच्या विकासाकडे लक्ष देत नसेल तर ..

The last house in the garden of Dr. Ambedkar ward took place | डॉ.आंबेडकर वॉर्डातील उद्यानाला लागली अखेरची घरघर

डॉ.आंबेडकर वॉर्डातील उद्यानाला लागली अखेरची घरघर


साहित्याची नासधूस : नागरिक म्हणतात, हिरवेगार बगिच्याची कल्पना हवेतच विरली

नागरिकांनीच पुढाकार घ्यावा


नागरिकांची एकजूट ही बाब कुठल्याही प्रशासनासाठी एक मोठे आव्हान ठरत असते. वारंवार निवंती करूनही नगर प्रशासन बगिच्याच्या विकासाकडे लक्ष देत नसेल तर यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यायला हवा. लोकशाही मार्गाने लढा देऊन बगिच्याच्या सौंदर्यीकरणाकडे अधिकारी व पदाधिकार्‍यांचे लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. यामुळे आपलाच पसिसर सुंदर होईल व अन्य नागरिकही यापासून बोध घेऊ शकतील. भंडारा : चांदणी चौकातून शास्त्रीनगराकडे जाणार्‍या मार्गावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर वॉर्ड आहे. या वॉर्डात असलेल्या उद्यानाला पाहिल्यावर त्याला उद्यान संबोधायचे काय? असा सवाल निर्माण होतो. कुठेही हिरवळ नाही वा बालकांसाठी मोरंजनात्मक खेळ साहित्य नाही. फक्त उद्यानासाठी जागा सोडण्यात आली आहे, असे दृश्य आहे. शहरातील बगिच्यांचा विकास व्हावे, असे नगर पालिका पदाधिकारी व अधिकार्‍यांना वाटत नसावे. आणि म्हणूनच या बगिच्याचेी सौंदर्यीकरण शहरातील अनञय बगिच्यांसारखे रखडलेले आहे.
बगिच्यातील घसरण पट्टी गंजलेली असून पाळणा बर्‍याच दिवसांपासून बेपत्ता आहे. वाळलेले गवत व झाडेझुडपी, कचरा अस्तव्यस्त स्वरूपात आहे. खेळण्याच्या अन्य साहित्य पया बगिच्यात नाहीत. बगिच्यातील रस्ता मात्र पक्का सिमेंट बांधकामाचे आहे. लहान परिसर लाभलेल्या या बगिच्याची उपेक्षा नगर पालिका प्रशासनाने कायम ठेवली आहे. सकाळी किंवा सायंकाळी फिरायला या बगिच्यात यावे, असे वॉर्डवासियांना वाटत असले तरी सुविधांअभावी, नागरीकांचे हे स्वप्न स्वप्नच राहणार काय? असे चित्र आहे. नगर पालिका दरवर्षी आपल्या वार्षिक बजेटमध्ये बगिच्यांच्या देखभाल व अन्य बाबींसाठी निधीची तरतूद करते, मात्र हा निधी खर्च केला जातो काय? हा खरा प्रश्न आहे. बोटांवर मोजण्याइतक्या शहरातील अन्य बगिच्यांच्या देखरेखीत बजेट खर्च होत असेल व दुसर्‍या बगिच्यांच्या विकासाला ठेंगा दाखविला जात असेल? तर त्याला काय म्हणावे.ही बाब नागरीकांनीच समजून घेणे आवश्यक आहे. लोखंडी एंगल असला तरी पाळणा मात्र गायब आहे. उद्यानात सिमेंट रस्ता असला तरी केरकचर्‍यामुळे उद्यानाचे स्वरूप बेढब झाले आहे.

Web Title: The last house in the garden of Dr. Ambedkar ward took place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.