वरठी येथे उभे राहणार पूर्व विदर्भातील सर्वात मोठे कोविड हॉस्पिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:27 IST2021-04-29T04:27:40+5:302021-04-29T04:27:40+5:30

भंडारा : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. हा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी राज्यशासन आणि सर्व यंत्रणा ...

The largest Kovid Hospital in East Vidarbha will be set up at Varathi | वरठी येथे उभे राहणार पूर्व विदर्भातील सर्वात मोठे कोविड हॉस्पिटल

वरठी येथे उभे राहणार पूर्व विदर्भातील सर्वात मोठे कोविड हॉस्पिटल

भंडारा : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. हा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी राज्यशासन आणि सर्व यंत्रणा सातत्याने प्रयत्न करत आहे. या परिस्थितीमध्ये अनेक रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी जागा नाही. अशा पद्धतीची माहिती मिळते. मात्र सर्व रुग्णांना सर्व आवश्यक उपचार मिळाले पाहिजेत, ही आपली भूमिका असून यादृष्टीने वरठी येथे सनफ्लॅग कंपनीजवळ १००० खाटांची व्यवस्था असलेले आणि सर्व सुविधांनी सुसज्ज असलेले कोविड हॉस्पिटल युद्ध स्तरावर उभारण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, आमदार नाना पटोले यांनी दिली. ते आज वरठी लगतच्या संबंधित जागेची पाहणी करण्यासाठी आले होते. याप्रसंगी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रियाज फारूकी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई आदी उपस्थित होते.

नाना पटोले म्हणाले, सदर हॉस्पिटल पूर्व विदर्भातील सगळ्यात मोठे हॉस्पिटल राहणार असून यामध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध राहतील. या हॉस्पिटलमध्ये जिल्ह्यातील अनेक रुग्णांना उपचार घेता येईल. सदर हॉस्पिटल उभारणीचे कार्य याच आठवड्यात सुरू होईल. येत्या तीन ते चार आठवड्यात हे काम पूर्ण होईल. जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल, असा आशावाद काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

Web Title: The largest Kovid Hospital in East Vidarbha will be set up at Varathi