धावत्या रेल्वेतून महिलेची बॅग लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:40 IST2021-08-17T04:40:54+5:302021-08-17T04:40:54+5:30

तुमसर : तिरोडा-तुमसर दरम्यान ललितपूर ते रायपूर एक्सप्रेस गाडीत एका महिलेची बॅग अज्ञात आरोपीने लंपास केली. सुमारे एक लाखाच्या ...

Lampas a woman's bag from a running train | धावत्या रेल्वेतून महिलेची बॅग लंपास

धावत्या रेल्वेतून महिलेची बॅग लंपास

तुमसर : तिरोडा-तुमसर दरम्यान ललितपूर ते रायपूर एक्सप्रेस गाडीत एका महिलेची बॅग अज्ञात आरोपीने लंपास केली. सुमारे एक लाखाच्या मुद्देमालाचा त्यात समावेश आहे. आरोपी पसार झाला असून अज्ञात आरोपीचा शोध तुमसर गोंदिया पोलीस व रेल्वे सुरक्षा बळ करीत आहे. या घटनेमुळे जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा, व सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या रेल्वे प्रशासनाच्या कार्य प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ललितपूर ते रायपूर एक्सप्रेस गाडीत सीमा श्रीवास्तव ही महिला प्रवास करीत होती. दरम्यान, तिरोडा ते तुमसर रोड रेल्वे स्थानका दरम्यान अज्ञात आरोपीने त्यांची बॅग हिसकावली. यात ४० हजारांची रोख रक्कम, ४९ हजार किमतीची सोनसाखळी, १६ हजारांच्या मोबाईलचा समावेश आहे. घटनेची तक्रार महिलेने तुमसर गोंदिया पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाकडे केली. आरोपीचा शोध सुरू आहे.

Web Title: Lampas a woman's bag from a running train