तांदळाच्या कोठीतून सोन्याचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:54 IST2021-01-08T05:54:39+5:302021-01-08T05:54:39+5:30

भंडारा : कुलूपबंद घर फोडून तांदळाच्या कोठीत ठेवलेले ४७ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने लंपास करण्याची घटना येथील खात ...

Lampas with gold ornaments from a rice field | तांदळाच्या कोठीतून सोन्याचे दागिने लंपास

तांदळाच्या कोठीतून सोन्याचे दागिने लंपास

भंडारा : कुलूपबंद घर फोडून तांदळाच्या कोठीत ठेवलेले ४७ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने लंपास करण्याची घटना येथील खात रोडवरील प्रगती काॅलनीत सोमवारी सायंकाळी उघडकीस आली.

वैशाली प्रदीप बालपांडे यांचे प्रगती काॅलनीत मलेवार नगरात घर आहे. त्या शनिवारी आपल्या मावशीच्या गावी गेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते. चोरट्याने या संधीचा फायदा घेत कुलूप तोडून आत प्रवेश केला. तांदळाच्या कोठीत स्टीलच्या डब्यात ठेवलेले दोन नग सोन्याचे रिंग वजन ३ ग्रॅम, ३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि पर्समधील रोख ७ हजार रुपये तसेच गल्ल्यातील दोन हजार रुपये असा ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. त्या सोमवारी सायंकाळी परत आल्या तेव्हा हा प्रकार लक्षात आला. भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

Web Title: Lampas with gold ornaments from a rice field