लाखनी तालुका काँग्रेसतर्फे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST2021-06-09T04:43:13+5:302021-06-09T04:43:13+5:30

लाखनी : गत काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलमध्ये सातत्याने दरवाढ होत आहे. पेट्रोलने प्रतिलीटर शंभरी पार केली आहे. डिझेलदेखील ९२ ...

Lakhni taluka to be held by Congress | लाखनी तालुका काँग्रेसतर्फे धरणे

लाखनी तालुका काँग्रेसतर्फे धरणे

लाखनी : गत काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलमध्ये सातत्याने दरवाढ होत आहे. पेट्रोलने प्रतिलीटर शंभरी पार केली आहे. डिझेलदेखील ९२ रुपये लीटर झालेले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी असतानादेखील केंद्र सरकारच्या चुकीच्या आणि स्वार्थी धोरणामुळे ही भाववाढ होत आहे. आधीच अडचणीत असलेल्या देशातील नागरिकांना ही भाववाढ करून केंद्र सरकार आणखी अडचणीत टाकत आहे.

याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आणि भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आदेशान्वये लाखनी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष राजू निर्वाण यांच्या नेतृत्त्वात स्थानिक पेट्रोल पंपासमोर पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते शफीभाई लद्धानी, लाखनी शहर अध्यक्ष पप्पू गिरेपुंजे, आकाश कोरे, डॉ. चंद्रकांत निंबार्ते, जयकृष्ण फेंडरकर, रूपलता जांभुळकर, माजी नगराध्यक्षा कल्पना भिवगडे, अनिल निर्वाण, विकास वासनिक, भोला उईके, ज्ञानेश्वर रहांगडाले, संजीव रहांगडाले, प्रिया खंडारे, संध्या धांडे, योगेश गायधने, लालू गायधने, देवदास मेहेर, प्रदीप मेश्राम, वसंतराव मेश्राम, कैलास लुटे, दुर्गेश चोले, सोनू रणदिवे, जितू भुरे, सचिन बागडे, विना नागलवाडे, मोरेश्वरी पटले, सीमा बनसोड, शालू बोपचे, नितीन भालेराव, योगेश झलके, अशोक पटले, विजय वाघाये, धनपाल बोपचे, राजू आसाराम निर्वाण, रितेश कांबळे, विक्रम लांजेवार, भूपेश शेंडे, मनोहर बोरकर, संजय नान्हे, वासुदेव नान्हे, मुन्ना निर्वाण आदी उपस्थित होते.

Web Title: Lakhni taluka to be held by Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.