लाखनीत सप्तधनू श्रावणी स्पर्धा उत्सव

By Admin | Updated: August 26, 2015 00:29 IST2015-08-26T00:29:41+5:302015-08-26T00:29:41+5:30

विवेकानंद वाचनालय लाखनी येथे सप्तधनू श्रावण स्पर्धा उत्सव संपन्न झाला. यात व्यंजन स्पर्धा, श्रावण क्विन व सप्तरंगी पूजा थाल सजावट स्पर्धा घेण्यात आली.

Lakhayeet Lampanu Shravani Competition Festival | लाखनीत सप्तधनू श्रावणी स्पर्धा उत्सव

लाखनीत सप्तधनू श्रावणी स्पर्धा उत्सव

सखी मंच उपक्रम : महिलांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग,
लाखनी : विवेकानंद वाचनालय लाखनी येथे सप्तधनू श्रावण स्पर्धा उत्सव संपन्न झाला. यात व्यंजन स्पर्धा, श्रावण क्विन व सप्तरंगी पूजा थाल सजावट स्पर्धा घेण्यात आली.
परीक्षक म्हणून श्रावण क्विन आॅडीयन्स (प्रेक्षक सखी) ठेवण्यात आल्या होत्या. तर सप्तरंगी व्यंजन स्पर्धा व सप्तरंगी पूजा थाल सजावट स्पर्धा यासाठी नलिनी पाखमोडे पूजाथाल सजावट स्पर्धा यासाठी नलिनी पाखमोडे, वरंदू गिऱ्हेपुंजे व आशा रंगारी यांनी परीक्षक म्हणून कार्य केले. कार्यक्रमाची सुरुवात इतनी शक्ती हमे देना दाता या गीतानी केली.
प्रास्ताविक श्रावणातल्या विविध सण उत्सव व निसर्ग यातून मनाच्या तंतू तंतूमधून स्त्रियांचे सुप्तगुण कौशल्य व व्रत वैकल्य यांचा उगम होऊन निसर्गाशी मैत्रीचे नाते घट्ट करणारी ही आजच्या व्यासपीठाची सखी अशी ओळख अरुणा सेलोकर माविम कार्यकर्ता यांनी केली.
कार्यक्रमात सप्तरंगी पूजा थाल स्पर्धात प्रथम क्रमांक माया हटवार यांनी घेतला तर द्वितीय क्रमांक शिला वासनिक यांनी घेतला. सप्तरंगी पूजा थाल स्पर्धेत प्रथम क्रमांक दिव्या निर्वाण यांनी घेतला तर द्वितीय क्रमांक संगीता घोनमोडे यांनी घेतला. श्रावण क्वीन स्पर्धेत प्रथम क्रमांक हेमलता थोटे, द्वितीय क्रमांक छाया गायधनी, तृतीय क्रमांक कविता गोळाकरे यांना देण्यात आला.
सखींना बक्षिस देऊन गौरविण्यात आले. सरतेशेवटी श्रावणातला आनंद व सखींनी नृत्याने केला. यावेळी निशा गायधनी, प्रणाली सावरकर, जयश्री कोहळे, शर्मिला खंडारे, ज्योती साठवणे, कविता मोलकिरे, दिव्या निर्वाण, संगीता हटवार, थानथराटे, शोभा राघोर्ते, शीला वासनिक, प्रभा बेलखोडे, रिता परेरा, मंदा निर्वाण, निशा गायधनी, तृप्ती थानथराटे, ब्रह्मरेखा गायधनी, पौर्णिमा नागदेवे, कविता गायधनी, वीणा डोंगरे, पल्लवी खिराडे, संगीता मस्के, अर्चना सार्वे, रजनी पडोळे, अलका पडोळे, पुष्पा हटवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार तालुका संयोजिका शिवानी काटकर यांनी मानले. (मंच प्रतिनिधी)

Web Title: Lakhayeet Lampanu Shravani Competition Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.