लाखनीच्या पतसंस्थेत दरोड्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 00:36 IST2019-07-07T00:35:17+5:302019-07-07T00:36:02+5:30
येथील अक्षय नागरी पत संस्थेच्या इमारतीत शिरून चोरट्यानी ट्राँगरूमसह तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. या पतसंस्थेतील रोख सुरक्षित आढळून आली.

लाखनीच्या पतसंस्थेत दरोड्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : येथील अक्षय नागरी पत संस्थेच्या इमारतीत शिरून चोरट्यानी ट्राँगरूमसह तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. या पतसंस्थेतील रोख सुरक्षित आढळून आली.
येथील समर्थ महाविद्यालयाजवळ बँकेचा दर्जा असलेली अक्षय नागरी सहकारी पतसंस्था आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी लोखंडी हत्याराने चॅनलगेटचे कुलूप तोडले. दरवाजा फोडून आत प्रवेश केला. सीसीटीव्हीचे वायर कापून टाकले. त्यानंतर चोरट्यांनी ट्राँगरूप आणि तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीही हाती लागलेले नाही.
विशेष म्हणजे बँकेत असलेली एक लाख ९० हजाराची रोख सुरक्षीत आहे. या बँकेत लॉकर सुविधा असून शहरातील अनेकांचे मौलवान दागिने आणि ऐवज ठेवण्यात आले आहे. या घटनेने लाखनी शहरात खळबळ उडाली आहे.