लाखनी, पवनी परिसरात चोरी

By Admin | Updated: February 23, 2017 00:23 IST2017-02-23T00:23:48+5:302017-02-23T00:23:48+5:30

आदर्शनगर लाखनी येथे अज्ञात चोरांनी घराचे दाराचे कुलूप तोडून केलेल्या घरफोडीत मंगळवारच्या मध्यरात्री १ लाख ५ हजार रुपयाचे सोन्या चांदीचे दागीने व नगदी रक्कम चोरानी लंपास केली.

Lakhani, theft in the Pawani area | लाखनी, पवनी परिसरात चोरी

लाखनी, पवनी परिसरात चोरी

नागरिक भयभीत : चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ
लाखनी : आदर्शनगर लाखनी येथे अज्ञात चोरांनी घराचे दाराचे कुलूप तोडून केलेल्या घरफोडीत मंगळवारच्या मध्यरात्री १ लाख ५ हजार रुपयाचे सोन्या चांदीचे दागीने व नगदी रक्कम चोरानी लंपास केली.
आदर्शनगर येथील संजय महादेव उके रा.लाखनी यांच्या घरी समोरील दाराला कुलूप लागलेला पाहून अज्ञात चोरानी २१ व २२ फेब्रुवारीच्या मध्यरात्री कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सोन्याचांदीचे दागीने व नगदी पैसे असे मिळून १ लाख पाच हजार रुपयांची धाडसी चोरी केली. याच परिसरात मागीलवर्षी एका घरी भरदिवसा चोरी झाली होती.
लाखनी परिसरात चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून गस्त वाढविण्याची नागरिकांची मागणी आहे. लाखनी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी श्वान पथकास पाचारण केले होते. चोऱ्याचे प्रमाण वाढत असल्याने सगळीकडे भितीचे वातावरण पसरले आहे. (तालुका प्रतिनिधी)
पवनी : मागील काही दिवसापासून पवनी परिसरात चोरीच्या प्रकरणात वाढ झाली असून आतापर्यंत चोरट्यांनी तीन ठिकाणी चोरी केली असून दोन प्रकरणात पोलीसात तक्रार केल्या असून एका प्रकरणात पोलीस तक्रार करण्यात आली नाही.
पवनी लगत असलेल्या शेषनगर येथील रहिवासी सुखदेव नरूले हे घटनेच्या रात्री खरबी येथे नातेवाईकाकडे गेले असता घरी चोरट्यांनी घराचा मुख्य लाकडी दरवाजा फोडून घरातील सोनी कंपनीचे एलसीडी २९ हजार रूपये, सोन्याचे डोरले ६०००, नगदी २००० रूपये असा ३७००० रूपयांचा ऐवज चोरुन नेला. घरातील सामानाची फेकाफेक केली. पोलिसांचा श्वान पथक गुन्हेगारापर्यंत पोहचू नये, यासाठी दुचाकीमधील पेट्रोल मुख्य गेटजवळ शिंपळून ठेवले होते. त्यामुळे श्वान पथक तिथेच फिरत होते. या प्रकरणाचा तपास ठाणेदार मधुकर गिते, उपनिरिक्षक सचिन गदादे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Lakhani, theft in the Pawani area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.