लाखनी कडकडीत बंद
By Admin | Updated: December 15, 2014 22:50 IST2014-12-15T22:50:30+5:302014-12-15T22:50:30+5:30
स्थानिक जिल्हा परिषद गांधी विद्यालयाच्या शाळा समिीचा अध्यक्षपदाचा वाद निर्माण झाल्यामुळे आज लाखनी बंदचे यशस्वी आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य विजय खोब्रागडे व सरपंच

लाखनी कडकडीत बंद
निषेध मोर्चा : गांधी विद्यालयात शाळा समितीचा वाद
लाखनी : स्थानिक जिल्हा परिषद गांधी विद्यालयाच्या शाळा समिीचा अध्यक्षपदाचा वाद निर्माण झाल्यामुळे आज लाखनी बंदचे यशस्वी आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य विजय खोब्रागडे व सरपंच उर्मिला आगाशे यांच्या नेतृत्वात जयस्तंभ चौक ते गांधी विद्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला.
गांधी विद्यालयाच्या शाळा समितीच्या अध्यक्षपदावरून जि.प. सदस्य विजय खोब्रागडे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी बदलविले. मुरमाडी सावरीच्या जि.प. सदस्य रूपलता जांभुळकर यांची नियुक्ती करून नवीन कार्यकारिणी गठित करण्याचे अधिकार दिले. याची माहिती खोब्रागडे यांना नव्हती. गांधी विद्यालय लाखनीच्या नावाने १९६१ पासून अस्तित्वात आहे. सदर शाळेची शाळा समितीचे पदसिद्ध अध्यक्ष लाखनीचे जि.प. सदस्य राहतात व ग्रामपंचायत लाखनीचे सरपंच सदस्य म्हणून कार्य करतात. असे असताना भौगोलिक क्षेत्राचे निमित्त पुढे करून शाळा समितीमध्ये फेरबदल केल्याच्या आरोपावरून निषेध मोर्चा काढण्यात आला. गांधी विद्यालयात निषेध मोर्चा गेल्यानंतर नायब तहसीलदार गोटेफोडे यांना निवेदन देण्यात आले. शाळा समिती पुर्ववत करण्यात यावी, जुन्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. याकरिता सात दिवसांचा अवधी प्रशासनाला दिला आहे.
शालेय शिक्षणमंत्री, यांना तहसीलदारामार्फत निवेदन देण्यात आले. निवेदन देताना जि.प. सदस्य विजय खोब्रागडे, सरपंच उर्मिला आगाशे, सुरेश गायधनी, शाम खेडीकर, पप्पु गिऱ्हेपुंजे, दिनेश वंजारी, विशाल तिरपुडे, किशोर मोटघरे, अनिल टहिल्यानी, शफी लद्धानी, पवन भुरे, धनुव्यास, डॉ. विकास गभणे, अश्विनी भिवगडे आदीसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)