शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
4
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
5
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
6
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
7
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
8
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
9
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
10
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
11
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
12
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
13
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
14
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
15
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
16
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
17
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
18
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
19
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश

रणरणत्या उन्हातही लाखांदूर पोलीस कर्तव्यदक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:01 IST

लाखांदूर तालुका तीन जिल्ह्याच्या सीमेला लागून आहेत. तरी या तालुक्याचे नाकेबंदी करणे मोठे आव्हान ठरते ते यशस्वी करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांनी सध्या आपले कौटुंबिक सुख बाजूला ठेवून यावेळी फक्त राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याला महत्व दिले आहे. काही पोलीस कर्मचारी आपल्या अनेक व्यक्तिगत समस्या पासून त्रस्त आहेत.

ठळक मुद्देकोरोनावर मात करण्यासाठी कसली कंबर : सतत २४ तास रस्त्यावर तत्पर

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : कोरोनावर मात करण्यासाठी देशात युद्ध पातळीवर संघर्ष सुरू आहे. या महायुद्धात वैद्यकीय कर्मचारी लढा देत आहेत. त्याचबरोबर पोलीस प्रशासन कोरोनाला हद्दपार करण्यासाठी दिवस रात्र पहारा देत आहेत. लाखांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत जवळपास २० कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणी सतत नाकाबंदी करीत आहेत. रणरणत्या उन्हातही आपल्या कर्तव्यापासून तिळमात्र ही विचलित होतानाही दिसत नाही. त्यांच्या कर्तव्य दक्षतेमुळे संपूर्ण लाखांदूर तालुक्यात ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यात यश मिळत आहे.लाखांदूर तालुका तीन जिल्ह्याच्या सीमेला लागून आहेत. तरी या तालुक्याचे नाकेबंदी करणे मोठे आव्हान ठरते ते यशस्वी करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांनी सध्या आपले कौटुंबिक सुख बाजूला ठेवून यावेळी फक्त राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याला महत्व दिले आहे. काही पोलीस कर्मचारी आपल्या अनेक व्यक्तिगत समस्या पासून त्रस्त आहेत. परंतु कर्तव्यासमोर त्यांच्या व्यक्तीगत समस्या पासून गौण झालेले आहेत. लॉकडाउन सुरु झाल्या पासून अनेक पोलीस शिपाई आपल्या कुटुंबाला भेटायला जाऊ शकले नाही. अशा प्रकारे कर्तव्य बजावत आहेत.कौटुंबिक समस्या किंवा व्यक्तिगत समस्या असल्यातरी कर्तव्यदक्ष जो आनंद मिळतो तो फार वेगळा असतो.-नितीन साठवणे, वाहतूक पोलीस

टॅग्स :Policeपोलिस