लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : झाडीपट्टीचे काश्मीर म्हणून पूर्व विदर्भातील भंडारा व गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. विपूल वनसंपदा, खळखळणारे झरे, नद्या, जलाशय व पर्यटनाची अनेक स्थळे आहेत. परंतु पर्यटन विकासाच्या बाबतीत पूर्व विदर्भ मागासलेला असून या स्थळांच्या विकासासाठी जवळपास ५० कोटी रूपयांची गरज आहे.भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश पर्यटनस्थळे राज्य शासनाने अ, ब, क या श्रेणीत घोषित केली असली तरी सोयी-सुविधांचा अभाव आहे. ईको टुरिझमच्या नावाखाली केवळ विकास आराखडा तयार करण्यात आला. परंतु तो आराखडा लालफितशाहीत रखडला. मागील चार दशकांपासून पर्यटन विकासाच्या नावावर तोकडा निधी उपलब्ध करून थातूरमातूर कामे केली जातात. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा ईको टुरिझममध्ये समाविष्ट करून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे विकास करण्यात यावा यासाठी पर्यटन प्रेमीसह एका संस्थेनेही पुढाकार घेतला होता. परंतु त्या मागणीलाही वाटाणाच्या अक्षता लावण्यात आले.पूर्व विदर्भातील पर्यटन व तीर्थस्थळांतर्गत राष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध अभयारण्य व नव्याने घोषित करण्यात आलेल्या कोका वन्यजीव अभयारण्य, नागझीरा, अंबागड किल्ला, श्री नृसिंह टेकडी माडगी, कोरंभी (भंडारा), रावणवाडी जलाशय, चकारा (अड्याळ), लाखा पाटलाची पहाडी, आंभोरा, दुर्गाबाई डोह गढकुंभली, गोंदिया जिल्ह्यातील प्राकृतिक पर्यटनस्थळ नवेगावबांध, नागझिरा, हाजराफॉल, गोंडवाना समाजाची धर्मभूमी असलेले प्रचारगढ, ईटियाडोह, भंडारा जिल्ह्यातील शंकर महादेव नेरला देवस्थान, सोनी नदी संगम, गिरोला पहाडी, भृशुंड गणेश मंदिर, गोसावी मठ, गुढरी जलाशय, मांगलीबांध परिसर, उत्तरवाहिनी श्रीक्षेत्र मांढळ, चारभट्टी (पुयार), सिंदपुरी (रूयाळ), शिव-पर्वताची गुफा (धुटेरा-तुमसर), हनुमंत देवस्थान खोडगाव (मोहाडी), गायमुख देवस्थान, सानगडी येथील सहानगढ किल्ला, पवनी येथील किल्ला, गोसीखुर्द धरण परिसर, भंडारा येथील प्रसिद्ध पांडे महल, खांबतलाव, तुमसर तालुक्यातील पांगळी परिसर यासह अनेक पर्यटनस्थळ व तीर्थस्थळे आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत.यापैकी तुमसर तालुक्यातील आंबागड येथे राजा बख्तबुलंदशहा द्वारे निर्मित कलात्मक व सुंदर वास्तुशिल्प निर्मित किल्ल्याचे दोन वर्षांपुर्वी किल्ल्याची डागडूजी करण्यात आली आहे.निसर्गाने मुक्तहस्तेपूर्व विदर्भात सौंदर्य दिले आहे. मात्र या पर्यटनस्थळांच्या विकासाबाबत राज्य शासन उदासीन आहे, हीच खरी शोकांतिका आहे. ग्रीन हेरीटेज या पर्यावरणवादी संस्थेने अनेक उपक्रमातून राज्य शासनाकडे संबंधित पर्यटनस्थळांच्या विकासाबाबत पाठपुरावा केला. पर्यटनमंत्र्यांनी विकास आराखडा मंजूर करण्यासोबतच भरीव निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासनही पूर्ण झालेले नाही. ईको टुरिझमला वाव देवून स्थळांचा विकासासाठी दोन्ही जिल्ह्यांतर्गत निधी द्यावा, अशी मुख्य मागणी ग्रीन हेरिटेज संस्थेचे अध्यक्ष मो.सईद शेख यांनी केले आहे.ईको टुरिझमला ‘खो’जिल्ह्यातील पर्यटन स्थळांमध्ये अद्ययावत सुविधा निर्माण करण्याच्या हेतूने राज्य शासनाने ईको टुरिझमअंतर्गत 'होम स्टे' ही संकल्पना अस्तित्वात आणली आहे. यात अद्ययावत विश्रामगृहे, पर्यटक व तिर्थयात्रेंसाठी राहण्याची व अन्य सुविधा देण्याबाबत झुकते माप द्यावे, अशी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची गरज आहे. मात्र यासंकल्पनेला पूर्व विदर्भात अक्षरश: खो देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील पर्यटन विकासाला खो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:50 IST
झाडीपट्टीचे काश्मीर म्हणून पूर्व विदर्भातील भंडारा व गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. विपूल वनसंपदा, खळखळणारे झरे, नद्या, जलाशय व पर्यटनाची अनेक स्थळे आहेत. परंतु पर्यटन विकासाच्या बाबतीत पूर्व विदर्भ मागासलेला असून या स्थळांच्या विकासासाठी जवळपास ५० कोटी रूपयांची गरज आहे.
जिल्ह्यातील पर्यटन विकासाला खो
ठळक मुद्देशासन उदासीन : झाडीपट्टीचा काश्मीर विकासापासून वंचित