नागपूर विभागात अव्वल तुमसर आगार तोट्यात

By Admin | Updated: December 9, 2014 22:45 IST2014-12-09T22:45:08+5:302014-12-09T22:45:08+5:30

सुरक्षित प्रवास, वक्तशीरपणा तथा नागपूर विभागात महसुलात अव्वल स्थान पटकाविणारे तुमसर आगार सध्या तोट्यात आहे. भंडारा विभागातील सर्वच आगार तोट्यात आहे. भंडारा विभागातील सर्वच आगार

Lack of topmost money in Nagpur division | नागपूर विभागात अव्वल तुमसर आगार तोट्यात

नागपूर विभागात अव्वल तुमसर आगार तोट्यात

तुमसर : सुरक्षित प्रवास, वक्तशीरपणा तथा नागपूर विभागात महसुलात अव्वल स्थान पटकाविणारे तुमसर आगार सध्या तोट्यात आहे. भंडारा विभागातील सर्वच आगार तोट्यात आहे. भंडारा विभागातील सर्वच आगार तोट्यात असल्याची माहिती आहे. अवैध प्रवासी वाहनांची वाढ व एस.टी. महामंडळाची नियोजनशून्य कार्यप्रणाली जबाबदार असल्याचे दिसून येते.
नागपूरविभागात तुमसर आगार महसूल प्राप्त करून देणारी सोन्याची अंडी देणारी कोंबडी असे संबोधिले जात होते. अनेक वर्षे तुमसर आगाराने तो मान पटकाविला होता. परंतु सध्या तुमसर आगार तोट्यात असल्याची माहिती आहे.
भंडारा विभागात एकूण सहा आगार आहेत. यात भंडारा, तुमसर, साकोली, पवनी, तिरोडा व गोंदिया आगारांचा समावेश आहे. सध्या सर्वच आगार तोट्यात सुरु असल्याची माहिती आहे. अवैध प्रवासी वाहतूक व नियोजनाचा अभाव यामुळेच आगार तोट्यात सुरु आहेत. तुमसर आगारात एकूण ६८ बसगाड्या आहेत. त्यात वारी ३, यशवंती ७ चा समावेश आहे. येथे चालकांची मंजूर पदे १३७ असून रिक्त पदे ५ तर वाहकांची मंजूर पदे १२६ असून १६ पदे रिक्त आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Lack of topmost money in Nagpur division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.