वीज वितरण केंद्रात कर्मचाऱ्यांचा अभाव

By Admin | Updated: June 10, 2014 23:54 IST2014-06-10T23:54:11+5:302014-06-10T23:54:11+5:30

सानगडी (डोंगरगाव) विद्युत वितरण केंद्रातून परिसरातील २४ गावांना वीज पुरवठा केला जातो. या केंद्रात १ कनिष्ठ अभियंता, १ लाईनमन व ४ सहाय्यक लाईनमन आहेत. या केंद्रात केवळ सहा कर्मचारी

Lack of staff in the power distribution center | वीज वितरण केंद्रात कर्मचाऱ्यांचा अभाव

वीज वितरण केंद्रात कर्मचाऱ्यांचा अभाव

सासरा : सानगडी (डोंगरगाव) विद्युत वितरण केंद्रातून परिसरातील २४ गावांना वीज पुरवठा केला जातो. या केंद्रात १ कनिष्ठ अभियंता, १ लाईनमन व ४ सहाय्यक लाईनमन आहेत. या केंद्रात केवळ सहा कर्मचारी कार्यरत असल्याने २४ गावांना सेवा पुरविण्यास त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. दोन वर्षापूर्वीपासून येथील वितरण कार्यालयात अपेक्षीत कर्मचाऱ्यांच अभाव आहे. परिणामी शेतकरी व नागरिकांची तारांबळ उडत आहे. येथील कर्मचाऱ्यांच्या पूर्ततेसाठी अनेकदा मागणी करण्यात आली आहे. परंतु दोन वर्ष लोटूनसुद्धा विद्युत वितरण विभागाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
या कार्यालयांतर्गत अधिकृत कर्मचारी सेवानिवृत्त तसेच बदली होऊन गेलेले आहेत. पण त्यांच्याऐवजी नवीन कर्मचारी दाखल झाल्याचे दिसून येत नाही. विद्युत वितरण विभागाच्या गलथान कारभाराला येथील नागरिक कंटाळल्ययाचे दिसत आहेत. येथील वीज वितरण कार्यालयाअंतर्गत सासरा हेडक्वॉर्टर्समध्ये एकूण सहा गावे आहेत. यापूर्वी या हेडक्वार्टरमध्ये संजय हटवार व सहाय्यक म्हणून सपाटे कार्यरत होते. या दोन्ही कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण झाले. याठिकाणी प्रतिनियुक्तीवर तुळशीराम बनकर सहाय्यक लाईनमन म्हणून रुजू झाले. दोन कर्मचाऱ्यांऐवजी एकच कर्मचाऱ्याला प्रतिनियुक्ती देण्यात आली. या हेडक्वॉर्टर्स मध्ये हजारोच्या संख्येत पंप कनेक्शन व हजारो घरगुती कनेक्शन आहेत. एक कर्मचाऱ्याला सहा गावाची जबाबदारी सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. या हेडक्वॉर्टर्समध्ये कार्यरत सहाय्यक लाईनमन तुळशीराम बनकर जीव मुठीत घेऊन सहा गावातील शेतकऱ्यांना व नागरिकांना सुरळीत सेवा देत आहेत. त्यांच्या कार्यतत्परतेने येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे असे असले तरी पुन्हा अधिकृत एका कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे.
सानगडी वीज वितरण कार्यालयात कनिष्ठ अभियंता गेडाम, लाईनमन बादशहा, सहाय्यक लाईनमन म्हणून तुळशीराम बनकर, पशिने, सोरदे, टिचकुले असे केवळ सहा कर्र्मचारी कार्र्यरत असून विद्युत सेवा देत असतानी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. निरुपायाने सर्व अडचणींवर मात करावी लागत आहे. येथील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेविषयी वर्तमानपत्रातून, निवेदनातून वितरण विभागाला कळविण्यात आले आहे, दोन वर्षापासून वितरण विभागाची उदासीनता येथील जनतेला अनुभवायला मिळत आहे. विद्युत वितरण विभागाच्या दिरंगाईविरूद्ध येथील जनता आवाज उठविणार असल्याचे चित्र दिसत आहे.(वार्ताहर)

Web Title: Lack of staff in the power distribution center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.