नेटवर्कअभावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:35 IST2021-01-03T04:35:32+5:302021-01-03T04:35:32+5:30

भंडारा : विविध शासकीय कार्यालयातील कामकाजांसह खासगी कंपनी कार्यालयातील कामे ऑनलाईन सुरू आहेत. त्यामुळे मोबाईलचा वापरही वाढला आहे. मात्र ...

Lack of network | नेटवर्कअभावी

नेटवर्कअभावी

भंडारा : विविध शासकीय कार्यालयातील कामकाजांसह खासगी कंपनी कार्यालयातील कामे ऑनलाईन सुरू आहेत. त्यामुळे मोबाईलचा वापरही वाढला आहे. मात्र आता नेटवर्कअभावी नागरिक त्रस्त झाले आहेत.

भंडारा शहरातील खात रोडवरील खोकरला ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या तुलसीनगर, गंगानगर, न्यू शिवाजी, रजनीनगर, ग्रामसेवक कॉलनी, वैशालीनगर, केशव नगरातील नागरिकांना मोबाईल नेटवर्कअभावी गेल्या काही दिवसांपासून त्रास सहन करावा लागत आहे. ही समस्या गत आठ ते दहा वर्षांपासूनची आहे. या परिसरात मागील दहा वर्षापासून नेटवर्कचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ऐन कोरोना संकटात नागरिकांना घरबसल्या इंटरनेटवर काम करणे कठीण झाले आहे. इतकेच नव्हे तर नागरिकांना मोबाईलवरून संवाद साधतानादेखील अनेकदा घरावर चढावे लागत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Lack of network