नेटवर्कअभावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:33 IST2020-12-29T04:33:51+5:302020-12-29T04:33:51+5:30

भंडारा : कोरोना संसर्गामुळे विविध शासकीय कार्यालयातील कामकाजांसह खाजगी कंपनी कार्यालयातील कामे ऑनलाईन सुरु झाली आहेत. त्यामुळे मोबाईलचा वापरही ...

Lack of network | नेटवर्कअभावी

नेटवर्कअभावी

भंडारा : कोरोना संसर्गामुळे विविध शासकीय कार्यालयातील कामकाजांसह खाजगी कंपनी कार्यालयातील कामे ऑनलाईन सुरु झाली आहेत. त्यामुळे मोबाईलचा वापरही वाढला आहे. मात्र आता नेटवर्कअभावी नागरिक त्रस्त झाले आहेत.

भंडारा शहरातील खात रोडवरील खोकरला ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या तुलसीनगर, गंगानगर, न्यू शिवाजी, रजनीनगर, ग्रामसेवक कॉलनी, वैशाली नगर, केशव नगरातील नागरिकांना मोबाईल नेटवर्क अभावी गेल्या काही दिवसांपासून त्रास सहन करावा लागत आहे. ही समस्या गत आठ ते दहा वर्षांपासूनची आहे. या परिसरात मागील दहा वर्षापासून नेटवर्कचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ऐन कोरोना संकटात नागरिकांना घरबसल्या इंटरनेटवर काम करणे कठीण झाले आहे. इतकेच नव्हे तर नागरिकांना मोबाईलवरुन संवाद साधतांना देखील अनेकदा घरावर चढावे लागत आहे.

Web Title: Lack of network