शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

पर्यटनस्थळाच्या विकासासाठी निधीचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2016 00:25 IST

झाडीपट्टीचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्हा नावारुपास आला आहे.

भंडारा : झाडीपट्टीचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्हा नावारुपास आला आहे. सातपुड्याची हिरवीगार किमया, दनदाट वनश्रीचा गालिचा, खळखळणारे झरे, भव्य निसर्गरम्य जलाशय, वन्यप्राणी व वनस्पतीची मुबलकता भंडारा जिल्ह्याचे वैभव ठरते. मात्र, तब्बल १२ वर्षांपासून या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी नाही. निधीअभावी या जिल्ह्याच्या पर्यटनस्थळांचा विकास रखडला आहे. झाडीपट्टीचा श्रीमंत असलेला जिल्हा पर्यटनस्थळांच्या बाबतीत उदासीन ठरला आहे. मराठीचे आद्यकवी मुवुंष्ठद राज, महानुभव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामींची पावनभूमी, महाकवी नाटककार भवभूतींचा जन्म आणि कमर्भूमी सम्राट अशोक, राजा बख्तबुलंद शाह, राजे रघुजी भोसले, पवनराजा यासारख्य शूरविरांचा शौर्य पराक्रम व महान कार्याचा गुणगौरव करणारा भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा आणि तांदळाची बाजारपेठ म्हणून भंडारा जिल्ह्याला गौरविण्यात येते.१९९९ ला भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्हा निर्माण झाला. या दोन्ही जिल्ह्यात भरपूर पर्यटनस्थळे आहेत. १९९९ मध्ये भंडारा जिल्ह्याच्या विभाजनानंतर या जिल्ह्याच्या वाट्याला जी पर्यटनस्थळे आली ती आजतागायत शाबूत आहेत. मात्र, त्यांचा विकास होऊ शकला नाही. जिल्ह्यात एकुण ३२ ‘क’ श्रेणी पर्यटनस्थळे आहेत. परंतु विकासाचा महामेरु व जिल्ह्याचे एकमेव भूमिपूत्र म्हणवणाऱ्या येथील नेत्यांनी या पर्यटनस्थळांकडेच पाठ फिरविली आहे.भंडारा जिल्ह्यातील संस्कृती दर्शविणाऱ्या अनेक प्राचीन वास्तू, पवित्र धार्मिक ऐतिहासिक, पुरातात्विक महत्त्वाची स्थळे आजही आपले अस्तित्व टिकविण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. नागपूरचे राजे बख्त बुलंदशाहाद्वारे निमिर्ती कलात्मक वास्तुशिल्पांचे सुंदर दर्शन घडविणारा आंबागड किल्ला (तुमसर), भंडारा येथील १५० वर्षापूर्वीचा पांडे महल, सानगडी (साकोली) येथील पुरातन सहानगड, प्राचीन मंदिराची नगरी, राजा कुशान, सम्राट अशोक यांच्या साम्राज्यात समृद्ध व विदर्भाची काशी म्हणून ओळखली जाणारी पवनी नगरी आपल्या नैसर्गिक सौंदर्यासोबतच धार्मिक व श्रद्धास्थान गायमुख, चांदपूर (तुमसर), रावणवाडी जलाशय (भंडारा), सिरेगावबांध, शिवनीबांध, गडकुंभली, दुर्गाबाई डोह (साकोली), चकरा (अड्याळ), लाखा पाटलाची टेकडी (कोका जंगल), चप्राड पहाडी (लाखांदूर), दशबल पहाडी, झिरी, शंकर महादेव (नेरला), सोनी नदी संग, गिरोला टेकडी, भृशुंड गणेश मंदिर, गुढरी जलाशय, मांगलीबांध, उत्तरवाहीनी (मांडळ) महास्तूप सिंदपुरी (पवनी), शिवपावर्तीची गुफा (धुटेरा-तुमसर), हनुमान देवस्थान खोडगाव, चंडिका माता मंदिर (मोहाडी), गोसेखुर्द धरण (पवनी) यासारख्या अनेक पर्यटन व धार्मिक स्थळांची यशोगाथा वर्णन करणारी ही ठिकाणे आहेत. परंतु नावाचाच श्रीमंत असणाऱ्या जिल्ह्यातील पर्यटनस्थळे मात्र अस्तित्वाची लढाई लढत आहेत. सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक पाश्र्वभूमी लाभलेला जिल्हा पर्यटन स्थळांच्या विकासाच्या बाबतीत मात्र शापित ठरलेला आहे. (शहर प्रतिनिधी)