सौंदड पुनर्वसन गावठाणात नागरी सुविधाचा अभाव

By Admin | Updated: February 7, 2015 23:18 IST2015-02-07T23:18:53+5:302015-02-07T23:18:53+5:30

विदर्भातील महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरण पूर्णत्वाच्या मार्गावर असताना शासनाने धरणाचे पाणी २४२ मीटर पर्यंत अडविण्याची भूमिका घेतल्याने धरणाच्या बुडीत क्षेत्रातील सौंदळ गावाला

The lack of civil facilities in the Saunda rehabilitation center | सौंदड पुनर्वसन गावठाणात नागरी सुविधाचा अभाव

सौंदड पुनर्वसन गावठाणात नागरी सुविधाचा अभाव

प्रकाश हातेल - चिचाळ
विदर्भातील महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरण पूर्णत्वाच्या मार्गावर असताना शासनाने धरणाचे पाणी २४२ मीटर पर्यंत अडविण्याची भूमिका घेतल्याने धरणाच्या बुडीत क्षेत्रातील सौंदळ गावाला पाण्याने वेढले असून काहीचे घरात पाणी शिरले आहे. मात्र पुनर्वसन गावठाणात अद्यापही अठरा नागरीसुविधा पूर्ण झाल्या नाही. त्यामुळे ग्रामस्थामध्ये रोष असून आधी पुनर्वसन नंतरच स्थलांतरण करण्याचा पवित्रा सरपंच राजहंस भुते व ग्रामस्थांनी घेतला आहे.
इंदिरा सागर गोसीखुर्द प्रकल्पाच्या पुनर्वसनात सौंदळ हे गाव प्रकल्पाच्या पोटात असून नदी शेजारी वसले आहे. गावात ३३८ कुटंूब व ७९२ लोकसंख्या आहे. प्रकल्प पुर्णत्वाच्या मार्गावर असून शासनाने पाणी अडविण्याची भूमिका घेतल्याने १३४ कुटूंबाचे गावठाण चकारा येथे स्थलांतरण झाले तर ज्यांना भुखंड मिळाले नाही त्यांचे घराचे चारही भोवती पाण्याने वेढले आहे. पाण्या शेजारील कुटूंब, साप, विच्छू आदी जलचर पाण्यापासून भित भित दिवस काठीत आहेत.
पूनर्वसन गावठान चकारा येथे १३४ कुटूंबाचे स्थलांतरण झाले आहे. बाकी २०४ कुटूंब, शाळा, ग्रामपंचायत नवीन गावठाणात स्थलांतरण झाले नाही. त्यामुळे स्थलांतरीत कुटूंबातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.
शासनाने ज्यांना भुखंड दिले नाही त्यांना तात्काळ भुखंड द्यावे त्यामुळे ते जुने गावठाण सोडतील, जुने विद्युत मिटर नवीन पुनर्वसनातील घरी ट्रान्सफर करून द्यावे, पाण्याखाली आलेल्या सुरबोडी येथील शेतीचे अनुदान देण्यात यावे, नवीन गावठाणात मकान बांधकामासाठी पाण्याची व्यवस्था करावी व उघड्या विहीरीचे तोंडीचे बांधकाम करण्यात यावे, बंद हॅन्डपंप, विद्युत पथदिवे सुरू करावे.
पाणी वाहून नेणारी नाही. जमीनदोस्त झाल्याने नालीचे बांधकाम नव्याने करण्यात यावे, प्रकल्पग्रस्तांना पेन्शन योजना व बीपीएलचा लाभ देण्यात यावा, कुटूंबाची संख्या पाहुण प्रकल्पग्रस्तांना शेती खरेदी करून द्यावी, जुन्या गावठाणातील वाढीव बांधकामाचा मोबदला देण्यात यावा, कलम ४ नंतर बांधकाम केलेल्या घराचा मुल्यांकन करून मोबदला देण्यात यावा, ढिवर समाज बांधवांना प्रकल्पात मच्छिमार करण्याचा अधिकार देण्यात यावा, ज्यांना नवीन गावठाणात भुखंड मिळाले परंतु त्यांना पॅकेजचा लाभ मिळाला नाही, त्या कुटूंबाना लाभ देण्यात यावा, सौंदळ, खापरी येथील काही घर टॅक्स धारकांना भुखंड व पॅकेजचा लाभ मिळाला नाही त्यांना लाभ देण्यात यावा. सौंदळ, खापरी येथील हनुमान मंदीर व बौद्ध विहाराला भुखंड देण्यात यावा, प्रकल्पग्रस्तांना नोकरी ऐवजी १५ लाख रूपये देण्यात यावे, सौंदळ गटग्रामपंचायत मधील सुरबोडी या गावाची शहानिशा करून त्याचे पुनर्वसन करण्यात यावे. नवीन गावठाणात अठरा नागरी पूर्ण झाल्या नाहीत. त्या पूर्ण करून द्याव्या, प्रकल्पबाधीत गावठाणातील व पुनर्वसन गावठाणातील संपूर्ण समस्या सोडविल्याशिवाय गाव सोडणार नाही, असे वरिष्ठांना निवेदन देवून सरपंच राजहंस भुते, उपसरपंच विजय निंबार्ते व प्रकल्पग्रस्तांनी मागणी केली आहे.

Web Title: The lack of civil facilities in the Saunda rehabilitation center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.