कृषी सहायकाचा मुख्यालयाला खो
By Admin | Updated: August 9, 2014 23:32 IST2014-08-09T23:32:13+5:302014-08-09T23:32:13+5:30
कृषी सहाय्यकाचे बारव्हा हे गाव मुख्यालयीन ठिकाण आहे. मात्र कृषी सहाय्यक रमेश हुकरे हे जेव्हापासून बारव्हा येथे रुजू झाले तेव्हापासून त्यांचे कधीही दर्शन झाले नाही. त्यामुळे शासनाच्या विविध

कृषी सहायकाचा मुख्यालयाला खो
बारव्हा : कृषी सहाय्यकाचे बारव्हा हे गाव मुख्यालयीन ठिकाण आहे. मात्र कृषी सहाय्यक रमेश हुकरे हे जेव्हापासून बारव्हा येथे रुजू झाले तेव्हापासून त्यांचे कधीही दर्शन झाले नाही. त्यामुळे शासनाच्या विविध कृषी विभागाच्या योजनेपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे.
शासन कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी विविध कल्याणकारी योजना राबवित असतो. संबंधित कृषी विभागातील योजनांची माहिती शेतकऱ्यांना वेळोवेळी व्हावी म्हणून गावोगावी कृषी सहाय्यकाची नेमणूक कऱ्णयात येते. अशाच प्रकारे लाखांदूर तालुक्यातील बारव्हा येथे रमेश हुकरे यांची कृषी सहाय्यक म्हणून नेमणूक करण्यात आली.
सदर कृषी सहाय्यक हे १ जानेवारी २०१३ रोजी बारव्हा मुख्यालयीन ठिकाणी रुजू झाले. कृषी सहाय्यकाचे बारव्हा हे मुख्यालयीन ठिकाण असून बारव्हा, जैतपूर, चिचाळ, खोलमारा, चिकना, धर्मापुरी, बोथली आदी गावाचा समावेश आहे. जेव्हापासून कृषी सहाय्यक बारव्हा येथे रूजू झाले तेव्हापासून ते बारव्हा येथील येतात. हेच शेतकऱ्यांना कळत नाही. त्यामुळे कृषी सहाय्यक कोण आहेत हे कळणे कठीण आहे. शासन राष्ट्रीय कृषी पिक विमा योजना राबवितो. फेब्रुवारी २०१४ कृषी वसंत योजना राबविण्यात आली. मात्र सदर योजनेची माहिती शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने शेकडो शेतकरी पिक विमा योजनेपासून वंचित आहेत. लाखांदूर येथे रासायनिक खत झिंक, तणनाशक औषधी, शेतीपयोगी अवजारे ५० टक्के अनुदानावर देण्यात येतात. मात्र या योजनांची माहिती शेतकऱ्यांना होतच नसल्याने शासनाच्या कल्याणकारी योजनांना मुकावे लागत आहे. बारव्हा येथील कृषी सहाय्यक हुकरे हे मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे बारव्हा लगत असलेल्या अनेक गावातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. कृषी सहाय्यकांवर संबंधित कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)