प्रगतीसाठी प्रत्येक घटकाचे श्रम महत्त्वाचे
By Admin | Updated: February 23, 2017 00:27 IST2017-02-23T00:27:10+5:302017-02-23T00:27:10+5:30
तालुक्यातील शैक्षणिक प्रगतीचा आलेख सतत उंचावत असून त्यासाठी शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेल्या प्रत्येक घटकाचे श्रम यासाठी कामी आले आहे.

प्रगतीसाठी प्रत्येक घटकाचे श्रम महत्त्वाचे
वाघाये यांचे प्रतिपादन : कनेरीत बीट स्तरीय शिक्षण परिषद
लाखनी : तालुक्यातील शैक्षणिक प्रगतीचा आलेख सतत उंचावत असून त्यासाठी शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेल्या प्रत्येक घटकाचे श्रम यासाठी कामी आले आहे. हे यश दिर्घकाळ टिकवून ठेवण्याचे काम आपल्याला करावेच लागेल आणि हे टिकविण्यासाठी प्रत्येक शिक्षण प्रेमी कटीबध्द आहे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी डी. पी. वाघाये यांनी केले.
तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कनेरी येथे बीटस्तरीय शिक्षण परिषदेला ते संबोधित करित होते. या कार्य प्रेरणा व्यासपीठावर शिक्षण विकास अधिकारी कोरे, आर. टी. टेंभुर्णे, मुख्याध्यापक धार्मिक, राऊत, धकाते, केंद्रप्रमुख सुरेश मोहबंसी (पोहरा), वाढीवे, पाचपोर, विस्तार अधिकारी राघोर्ते, विषय साधन व्यक्ती नरेश नवखरे आदी उपस्थित होते. शिक्षण परिषदेला पोहरा, जेवनाळा व पालांदूर या तीन केंद्रातील वर्ग १ ते ८ ला शिकविणारे सर्व व्यवस्थापनाचे एकूण २१२ शिक्षक उपस्थित होते. तसेच लाखनी तालुक्यातील विषय साधन व्यक्ती उपस्थित होते.
शिक्षण परिषदेतील कार्यशाळेत ज्ञानरचनावाद व प्रगत शाळेचे २५ निकष या विषयावर डी. डी. दमाहे यांनी मार्गदर्शन करुन शिक्षकांच्या कल्पना स्पष्ट केल्यात.
डिजीटल या विषयावर जिल्हा परिषद शाळा चिखला, पंचायत समिती तुमसर येथील टेक्नोसेव्ही शिक्षक कैलास चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. डिजीटल शाळा करताना घ्यावयाची काळजी व विधि अध्ययन अनुभव यावर डिजीटल पद्धतीने मार्गदर्शन केले.
शाळा सिध्दी बाबत सहायक शिक्षक नदीम खान यांनी मार्गदर्शन केले. शाळा सिध्दी मानके, गाभाघटक, क्षेत्रे इ. बाबत सविस्तर कथन केले.
सर्व मुख्याध्यापकांनी २५ फेब्रुवारीच्या आत शाळा सिध्दी मध्ये नोंदणी करुन गुणदान भरावे असे आवाहन याप्रसंगी नदीम खान यांनी केले. जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या संदर्भात विस्तार अधिकारी एम. व्ही. कोरे यांनी मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिलेले केआरए, सद्यास्थिती आणि गरज असलेल्या विद्यार्थ्यांना मदत याबाबतीत नरेश नवखरे यांनी मार्गदर्शन केले. परिषदेची सर्व व्यवस्था कनेरी शाळेकडून करण्यात आली. शिक्षण परिषदेची सांगता वंदेमात्रम गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन रषेश फटे यांनी व प्रास्ताविक विस्तार अधिकारी आर. टी. टेंभुर्णे यांनी केले. आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख सुरेश मोहबंशी यांनी केले.
शिक्षण परिषदेकरिता विस्तार अधिकारी आर. टी. टेंभुर्णे, केंद्रप्रमुख सुरेश मोहबंशी, वाढीवे कनेरी शाळेचे मुख्याध्यापक तेजराम वाघाये, मेघराज वाघाये, गुलशन ठवकर, शुभांगी गिऱ्हेपुंजे व केंद्रातील शिक्षक हिरामण वाघाये, रमेश फटे, महेंद्र लांजेवार, रुपेश नागलवाडे व सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)