कुकडे यांनी घेतली पवार यांची सदिच्छा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 22:48 IST2018-06-04T22:48:26+5:302018-06-04T22:48:41+5:30

भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांची मुंबई येथील निवासस्थानी सोमवारी सदिच्छा भेट घेतली.

Kukade gifted a wishful greetings to Pawar | कुकडे यांनी घेतली पवार यांची सदिच्छा भेट

कुकडे यांनी घेतली पवार यांची सदिच्छा भेट

ठळक मुद्दे७ जूनला घेणार शपथ

भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांची मुंबई येथील निवासस्थानी सोमवारी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी खा. सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. पवार यांनी कुकडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून शुभेच्छा दिल्या. कुकडे हे ७ जूनला खासदारपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात पक्षाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने पक्षाची बांधणी करून आगामी निवडणुकांना कसे सामोरे जायचे यावर आणि पोटनिवडणुकीतील विजयावर खा.पवार यांनी यावेळी चर्चा केली.

Web Title: Kukade gifted a wishful greetings to Pawar