केटीएसमध्ये क्षारजल संजीवनी जनजागरण अभियान प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:24 IST2021-07-15T04:24:51+5:302021-07-15T04:24:51+5:30
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांनी ७० टक्के बालमृत्यूचे कारण हे अतिसार असते. त्यामुळे आदिवासी व अतिदुर्गम भागातील बालमृत्यू ...

केटीएसमध्ये क्षारजल संजीवनी जनजागरण अभियान प्रारंभ
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांनी ७० टक्के बालमृत्यूचे कारण हे अतिसार असते. त्यामुळे आदिवासी व अतिदुर्गम भागातील बालमृत्यू जर कमी करायचे असतील तर क्षारजल संजीवनीबाबत व्यापक जनजागृती झाली पाहिजे. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी अतिसार नियंत्रण पंधरवडादरम्यान प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात ओआरएस कॉर्नर निर्माण केला जात आहे.
माता बैठका घेऊन त्यात क्षारजल संजीवनीबाबत जनजागरण केले जाणार आहे. झिंक गोळ्याचा स्टॉक ग्रामीण रुग्णालयात मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिला आहे. अतिसारमुळे जलशुष्कता निर्माण होते व क्षारजल संजीवनी हाच एक रामबाण उपाय आहे. त्यामुळे अतिसाराने होणारे ९० टक्के बालमृत्यृू आपण टाळू शकतो. त्यामुळे १२ जुलै ते २७ जुलैदरम्यान अतिसार नियंत्रण पंधरवडानिमित्त व्यापक प्रमाणावर जनजागृती निदान व मोफत उपचार होणार आहेत. याचा आपण लाभ घ्यावा, असे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी कळविले आहे.