ज्ञानदान बाल संस्कार शिबिराची सांगता
By Admin | Updated: June 9, 2016 00:49 IST2016-06-09T00:49:43+5:302016-06-09T00:49:43+5:30
संत ज्ञानेश्वर सेवा समितीच्या वतीने १६ वर्षापासून संत ज्ञानेश्वर मंदिर शिवनगर तुमसर येथे नि:शुल्क ज्ञानदान...

ज्ञानदान बाल संस्कार शिबिराची सांगता
१६ वर्षांची परंपरा : संत ज्ञानेश्वर सेवासमितीचा पुढाकार
तुमसर : संत ज्ञानेश्वर सेवा समितीच्या वतीने १६ वर्षापासून संत ज्ञानेश्वर मंदिर शिवनगर तुमसर येथे नि:शुल्क ज्ञानदान बाल संस्कार शिबिराचे आयोजन अव्याहतपणे सुरु आहे.
दि.१५ मे ते ५ जून पर्यंत या २१ दिवसाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्यातून ६० विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
डॉ.अनंत बागडे यांनी विद्यार्थ्यांना योगासने, प्राणायाम व ध्यान यांचे संस्कार दिले. डॉ.अग्रवाल व डॉ.गादोवार यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली.
ह.भ.प. वाघाये, ह.भ.प. शेखर महाराज, ह.भ.प. गोंधळे महाराज, ह.भ.प. बावणे महाराज व ह.भ.प. शेखर महाराज यांनी विद्यार्थ्यांना गीतापाठ, विष्णू सहस्त्र नाम जप, हरिपाठ व स्वाध्याय पाठ शिकविले. शिबिरासाठी समितीचे आयोजक शिव कनपटे, बडवाईक, तिपुडे, मलेवार, माया, संध्या, सेलोकर, दलाल आणि समितीच्या अन्य सदस्यांसह ग्रामस्थांनी सहकार्य केले. यात शिबिरार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)