तरुण पिढी अडकली व्यसनाच्या विळख्यात
By Admin | Updated: May 27, 2014 23:29 IST2014-05-27T23:29:52+5:302014-05-27T23:29:52+5:30
आजची युवा पिढी देशाचे उद्याचे उज्ज्वल भविष्य समजले जाते. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या एकविसाव्या शतकात युवा पिढीला विविध व्यसनांनी ग्रासले आहे. एवढेच नव्हे तर सध्या

तरुण पिढी अडकली व्यसनाच्या विळख्यात
बारव्हा : आजची युवा पिढी देशाचे उद्याचे उज्ज्वल भविष्य समजले जाते. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या एकविसाव्या शतकात युवा पिढीला विविध व्यसनांनी ग्रासले आहे. एवढेच नव्हे तर सध्या अन्नापेक्षा व्यसन महाग झाले असूनही आजची भावी युवा पिढी व्यसनाच्या विळख्यात गुरफटून गेली आहे. दिवसातून किमान दोनवेळा जेवण घेतले जाते. सकाळी न्याहारी, दुपारी व रात्री जेवण अशी पद्धत आहे. शरीरासाठी आवश्यक कॅलरीज या जेवणातून प्राप्त होतात. त्यामुळे शुद्ध आणि शाकाहारी जेवणाकडे पूर्वीपासून भारतीयांचा कल राहीला आहे. मात्र हल्ली मानवाची जीवनशैलीच बदलली आहे. मानवाची दिनचर्याही पार बदलून गेली आहे. शरीराला आवश्यक असणार्या बाबींपेक्षा शरीराला अपायकारक ठरणार्या वस्तूंचे सेवन करण्याकडे कल वाढला आहे. युवा पिढी तर पार भरकटली आहे. शरीराला अपायकारक असणार्या तंबाखु, सिगरेट आदी व्यसनाच्या विळख्यात युवक गुरफटले आहेत. दिवसातून किमान पाच ते दहा वेळा तंबाखू, खर्रा, गुटख्याचे सेवन केले जात आहे. सोबतच सिगारेटचा धूर वातावरणात सोडण्यातही युवक पुढे आहेत. कमी दर्जाचा तंबाखू खर्रा किमान दहा रुपयाचा असून विशिष्ट तंबाखू खर्रा १५ ते ३0 रुपयाच्या घरात आहे. हा खर्रा दिवसातून पाचवेळा खातो म्हटले तरी किमान १00 ते १५0 रुपये दररोज लागतात. तंबाखूच्या एका पुडीची किंमत तीन रुपये आहे तर सिगारेटची किंमत ३ रुपयापासून ४0 रुपयापर्यंत आहे. साधारणत: तीनही वस्तूचा खर्च १00 रुपयाच्यावर आहे. मात्र तरीही दिवसातून चार ते पाच सिगरेट फुकणारे, चार ते पाच खर्रा खाणारे सर्वत्र दिसतात. सर्वसामान्यांना दिवसातून किमान दोन र्खे लागतात. त्याचा खर्च ३0 रुपये येतो. मात्र तरीही खर्रा खाण्यात कसूर केली जात नाही. सिगारेटच्या आहारी ही जादा प्रमाणात युवक वर्गच गेला आहे. शाळा, महाविद्यालयासमोर असलेल्या पानटपरी व हॉटेलच्या मागे युवक सिगारेटचे झुरके ओढताना दिसतात. काही युवक चक्क वर्गात तासिका सुरू असताना तंबाखू घोटून आपली तलफ भागवितात. तंबाखू व सिगारेटच्या पाकिटावर जरी कॅन्सरग्रस्ताचा जबडा काढला असला तरी तंबाखूचे सेवन केले जात आहे. बाहेरगावी राहणार्या विद्यार्थ्यांना दोन वेळच्या जेवणाचा खर्च केवळ ३0 ते ३५ रुपये पडतो, मात्र खर्राचा खर्च ४0 रुपये पडतो. अर्थात दोन वेळच्या जेवणापेक्षा खर्रा महाग पडतो, तरीही त्याचे सेवन सर्रास केले जाते. अन्नापेक्षा व्यसन महाग असूनही युवक त्याला मोठय़ा प्रमाणात बळी पडत आहेत. शरीरासाठी हानिकारक असलेल्या वस्तूचे सेवन करीत आहेत. मात्र याकडे कुणाचेच लक्ष नाही. व्यसनाचा हा विळखा युवा पिढीसाठी अत्यंत घातक ठरत आहे. (वार्ताहर)