शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जाणून घ्या रानभाज्या खाण्याचे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 14:25 IST

Bhandara : तुम्ही ह्या रानभाज्या खाल्ल्या का?

भंडारा : रानभाज्या खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. दिवसेंदिवस शेतातून रानभाज्या नामशेष होत असल्या तरी ग्रामीण भागात आजही रानभाज्या मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. रानभाज्या आरोग्यदायी असल्याने दररोजच्या आहारात रानभाज्या महत्त्वाच्या आहेत. वासाठी रानभाज्यांचा रोजच्या आहारात वापर गरजेचा आहे.

रानभाज्या खा, ठणठणीत राहा!तांदुळजा :■ निरोगी आणि आरोग्याला पोषक सर्व घटक मिळत असल्याने पालेभाज्या दैनंदिन आहारात असणे गरजेचे आहे. रानभाज्या खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते, शरीराला पोषक घटक मिळतात. रानभाज्या खा आणि ठणठणीत राहा, असे बोलले जाते.■ तांदुळजा ही एक गावाकडची लोकप्रिय अशी रानभाजी आहे. शरीराला 'सी' जीवनसत्त्व मिळावे म्हणून तांदुळजाची भाजी खावी, असे सांगितले जाते. जर कोणाला गोवर, कांजण्या आल्या किंवा खूप ताप आला तर शरीरातील उष्णता कमी करावयास तांदुळजा उपयुक्त ठरते.

अंबाडी :■ अंबाडीच्या भाजीत कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, झिंक, जीवनसत्त्व 'अ' 'क' अशा पोषक घटकांसह खनिजांचा उत्तम स्रोत आहे.■ उत्तम प्रमाणात लोह आणि फॉलिक अॅसिडच्या उपलब्धतेमुळे रक्तवर्धन होते. डोळे, केस, हाडांसाठी तसेच रक्तदाब नियंत्रणासाठी ही भाजी उपयुक्त आहे.

माठाची भाजी :■ थोडी चिकट असणारी ही भाजी, श्रावण महिन्यातील सणात नैवेद्य दाखविण्यासाठी केली जाते. काही लोक याच भाजीला माठला ही म्हणतात.

पाथरी :■ ही रानभाजी शेतात सहज कुठेही उपलब्ध होते. खाण्यासाठी थंड असते. पित्ताचा त्रास कमी होऊन आराम मिळतो. पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. आरोग्यासाठी फायदेशीर भाजी आहे.

रानभाज्यांसह इतर पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पौष्टिक घटक असतात. जीवनसत्त्वांमुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे दैनंदिन आहारात पालेभाज्यांसह रानभाज्या खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. - डॉ विश्वनाथ नागदेवे, आहारतज्ज्ञा, भंडारा

पाऊस वेळेवर, रानभाज्या मिळतील खायलायंदाच्या वर्षी पाऊस उशिरा आल्याने आपल्या शेतात दुर्मीळ असलेल्या व आपल्या नजरेस न पडणाऱ्या पण आरोग्यासाठी चांगल्या असलेल्यारानभाज्या खायला मिळणार आहेत. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सvegetableभाज्याbhandara-acभंडारा