दुसऱ्याचे दु:ख ओळखणे हाच बौद्ध धर्माचा उपदेश
By Admin | Updated: February 9, 2015 23:06 IST2015-02-09T23:06:50+5:302015-02-09T23:06:50+5:30
मानवाच्या जीवनात श्रध्दा असणे गरजेचे आहे. श्रध्देला प्रकट करण्याकरीताच महासमाधी भुमी महास्तुपाची निर्मिती करण्यात आली आहे. जापानच्या विश्व प्रसिध्द पिसे बौध्द विहाराची

दुसऱ्याचे दु:ख ओळखणे हाच बौद्ध धर्माचा उपदेश
पवनी : मानवाच्या जीवनात श्रध्दा असणे गरजेचे आहे. श्रध्देला प्रकट करण्याकरीताच महासमाधी भुमी महास्तुपाची निर्मिती करण्यात आली आहे. जापानच्या विश्व प्रसिध्द पिसे बौध्द विहाराची या ठिकाणी आठवण होते. श्रध्देची भावना जपानी भारतीयांकडून शिकले. दुसऱ्याचे दुख: ओळखून जीवन जगणे हाच बौध्द धर्माचा उपदेश आहे, असे प्रतिपादन जपानच्या इचीगुओ तेरासु उन्दो तेंदाई संघाचे अध्यक्ष शोतायु योकोयामा यांनी केले.
रुयाळ (सिंदपूरी) येथील महासमाधी महास्तुपाच्या आठव्या वर्धापन दिनी आयोजित धम्ममहोत्सवात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पत्र्त्रामेत्ता संघाचे अध्यक्ष भदंत संघरत्न मानके होते. याप्रसंगी जपानच्या तेंदाई संघाचे भदंत खोशोतानी, भदंत मुखवयामी, भदंत शोझे आराही, खोदो कोंदो, तिबेट चे लोबज्ञान तथा अखिल भारतीय भिख्कु संघाचे संघानुशासक भदंत सदानंद, खासदार नाना पटोले, आमदार रामचंद्र अवसरे, आमदार जोगेंद्र कवाडे, विपश्यना रिसर्च इन्स्टीटयूटचे डॉ. अंगराज चौधरी रुयाडच्या सरपंचा कवीता मोटघरे, सिंदपूरीच्या सरपंच प्रमोदीनी खोब्रागडे, डॉ. बालचंद्र खांडेकर, मोहन पंचभाई, हंसाताई खोब्रागडे, पवनीच्या नगराध्यक्ष रजनी मोटघरे उपस्थित होते. संघरत्न मानके यांनी महास्तुपाची ही वास्तु भारतात सर्वात मोठी व आंतरराष्ट्रीय स्तराची असल्यामुळे हा महास्तूप भारत-जपानच्या मैत्रीचे प्रतीक बनल्याचे सांगितले. खासदार नाना पटोले यांनी महास्तुपाच्या विकासासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.
रुयाळ येथील सम्राट अशोक बुध्द विहारातून सिंदपूरी बौध्द विहार होत महास्तुपापर्यंत धम्म रॅली काढण्यात आली. प्रास्ताविक डॉ. बालचंद्र खांडेकर, संचालन माजी न्यायाधीश महेंद्र गोस्वामी व आभार लोमेश सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमासाठी मनोहर मेश्राम, शिलरत्न कवाडे, जयराज नाईक, बाबुराव वाघमारे, प्रज्ञानंद कवाडे, राजकुमार वंजारी, गजेंद्र गजभिये, जयसर दहिवले, देवचंद बंसोड, करुणा टेंभुर्णे, सुमीत ढाले, पंकज गोंडाने, संघर्ष काबळे, बंडू रामटेके, भक्तराज गजभिये, पंकज सोमकुंवर, स्वप्नील ढाले, चेतन गजभिये, सचीन पोटपोसे, रमेश मोटघरे, शिलमंजू सिंहगडे तसेच बौध्द उपासक, उपासिका सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)