चाकूचा धाक दाखवून लुटले
By Admin | Updated: June 5, 2016 00:15 IST2016-06-05T00:15:58+5:302016-06-05T00:15:58+5:30
अंधाराचा फायदा घेत दोन अनोळखी इसमांनी दुचाकीस्वारांना चाकूचा धाक दाखवीत लुटले.

चाकूचा धाक दाखवून लुटले
दोन जणांना अटक : पिडकेपार जंगल शिवारातील घटना
साकोली : अंधाराचा फायदा घेत दोन अनोळखी इसमांनी दुचाकीस्वारांना चाकूचा धाक दाखवीत लुटले. ही घटना साकोली तालुक्यातील पिंडकेपार जंगल शिवारात घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
सतीश कठाणे (३८) रा. परसटोला हे शुक्रवारी रात्री पिंडकेपारवरुन स्वगावी दुचाकी एम.एच. २० के.यु. ७८४९ ने जात असता वाटेत दुचाकी एम.एच. ३५ एन. ८०६६ वर स्वार दोन अज्ञात इसमांनी कठाणे यांना थांबविले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील ६ हजार ५०० रूपये हिसकाविले. कठाणे यांनी याप्रकरणाची तक्रार साकोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
दुचाकी क्रमांकावरुन पोलिसांनी शनिवारला दोन इसमांना ताब्यात घेतले आहे. यापूर्वीही या परिसरात अशा घटना घडलेल्या आहेत. त्यावेळीही तशा तक्रारी पोलिसात झाल्या होत्या.
मात्र अजूनपर्यंत या आरोपीचा शोध लागला नाही. त्यामुळे या प्रकरणात ताब्यात असलेल्या दोघांचा त्यापूर्वीच्या घटनांमध्ये सहभाग होता का? या दिशेनेही साकोली पोलीस तपास करीत आहेत.
(तालुका प्रतिनिधी)