किसनपूर मूलभूत सुविधांपासून वंचित
By Admin | Updated: August 12, 2014 23:36 IST2014-08-12T23:36:15+5:302014-08-12T23:36:15+5:30
करडी(पालोरा): कोका जंगल टेकड्यांच्या पायथ्याशी न्यू नागझिरा व्याघ्र अभयारण्याच्या सिमेवर असलेल्या नक्षलप्रभावित किसनपूर विकासापासून कोसो दूर आहे.

किसनपूर मूलभूत सुविधांपासून वंचित
करडी(पालोरा) : करडी(पालोरा): कोका जंगल टेकड्यांच्या पायथ्याशी न्यू नागझिरा व्याघ्र अभयारण्याच्या सिमेवर असलेल्या नक्षलप्रभावित किसनपूर विकासापासून कोसो दूर आहे. स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंंतरही गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही.व्याघ्र प्रकल्पामुळे जंगलावर आधारित व्यवसाय बंद पडल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे.
कोका जंगल टेकड्यांच्या घनदाट अभयारण्याशेजारी फुटक्या तलावाच्या जवळ मोहाडी तालुक्यातील किसनपूर गाव आहे.
सध्या गावाच्या सभोवतालचा परिसर न्यू नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या विस्तारित झोनमध्ये मोडतो. गावाच्या शेजारीच गोंदिया जिल्ह्याच्या सीमा सुरु होतात. स्वातंत्र्याच्या काही वर्षापर्यंत येथे ५०-६० घरांची वस्ती होती. आज केवळ सहा कुटुंब वास्तव्याला आहेत.
जंगलातील लाकडे, काड्यामोळ्या आणून शेजारील गावात जाऊन विकणे, त्याचबरोबर झुडपी जंगलाच्या जागेत शेती करुन येथील नागरिक आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवितात. अगोदर येथे वनपरिक्षेत्रधिकाऱ्याचे कार्यालय सुद्धा होते. मात्र विद्युत, शिक्षण व रस्त्याच्या असुविधेमुळे येथील लोकांनी ३ किमी अंतरावरील मोकळ्याजागेत वसाहत तयार केली. नागरिक गाव सोडून जाऊ लागल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी निवासस्थाने रिकामी केली आहेत.
मोठ्या गावात स्थलांतरित झाले. गावात केवळ ६ कुटुंब वास्तव्याला आहेत. प्राथमिक शिक्षणासाठी येथील मुलांना जंगलातून ३ किमीचे अंतर पार करुन स्थलांतरीत गावात जावे लागते. तर ८ ते १० वर्गासाठी ७ किमी अंतरावरील गावाकडे पोहोचावे लागते. यामुळे काही पालकांनी मुलांना शाळेत पाठविणे बंद केले आहे. गावात शिक्षणाचे प्रमाण नगण्य आहे. निरक्षणतेबरोबर कुपोषणाचे प्रमाण सुद्धा बरेच आहे.
गावात जाण्यायेण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने पावसाळ्यात अनेक कठीनाईचा सामना करावा लागतो. आठवडी बाजारासाठी पालोरा गावी तर दैनंदिन व्यवहारासाठी करडी गावाशी संपर्क साधताना परिश्रम घ्यावे लागतात.
किसनपूर गाव जांभोरा गटग्रामपंचायत अंतर्गत मोडत असले तरी येथील नागरिकांना ग्रामपंचायतमध्ये प्रतिनिधीत्व मिळत नाही. गावात त्यामुळे शासकीय योजनांचा अभाव दिसून येतो. सन १९९३ ला गावात नक्षलवादी येऊन गेल्याची नोंद पोलीस अभिलेखात आहे. परंतु गाव विकासासाठी ठोस उपाययोजना आखल्या गेल्या नाहीत. दोन वर्षाअगोदर गावात विद्युतची सोय नव्हती.
लोकप्रतिनिधी व विद्युत विभागाच्या प्रयत्नामुळे गावात विद्युत पोल पोहचून डीपी लावली गेली. अंधाराचे साम्राज्य असलेल्या गावात प्रथमच प्र्रकाश पडला. आजही गाव पक्का रस्ता व शिक्षणाच्या सोयींपासून वंचित आहे. (वार्ताहर)