किसान सभेचे धरणे आंदोलन
By Admin | Updated: September 18, 2016 00:39 IST2016-09-18T00:39:30+5:302016-09-18T00:39:30+5:30
अखिल भारतीय किसान सभेच्या देशव्यापी मागणी दिनाच्या आवाहनानुसार महाराष्ट्र राज्य किसान सभा ...

किसान सभेचे धरणे आंदोलन
विविध मागण्यांसाठी : जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
भंडारा : अखिल भारतीय किसान सभेच्या देशव्यापी मागणी दिनाच्या आवाहनानुसार महाराष्ट्र राज्य किसान सभा जिल्हा भंडाराच्या वतिने शुक्रवारला जिल्हाधिकारी कार्यालयसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.़
आंदोलनाच्या अध्यक्षस्थानी किसान सभेच जिल्हाध्यक्ष सदानंद इलमे होते़ या प्रसंगी झालेल्या सभेत म़ रा़ लालबावटा शेतमजूर युनियनचे सरचिटणीस शिवकुमार गणवीर व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव व नगरसेवक हिवराज उके यांचे प्रमुख मार्गदर्शन झाले.
प्रास्ताविक किसान सभेचे जिल्हा सचिव माधवराव बांते यांनी केले़ यावेळी ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना १० हजर रुपये पेंशन द्यावे, तसा कायदा करण्यात यावा, २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा, थकीत बील माफ करावे, आधारभूत किमंती पेक्षा कमी भावाने शेतमालाची खरेदी-विक्री केल्यास गुन्हा दाखल करावा, स्वामीनाथन कमेटीच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी, शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा एवढा भाव देण्यात यावा, वेळेवर धान खरेदी केंद्र सुरु करावे व ते प्रत्येक गावात सुरु करावे, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करावे, रेशन व्यवस्था मजबूत करण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फेत प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या नावे अप्पर जिल्हाधिकारी प्रदीप डांगे यांनी स्विकारले़
शिष्टमंडळात शिवकुमार गणवीर, सदानंद इलमे, माधवराव बांते, हिवराज उके, माणिकराव कुकडकर, वामनराव चांदेवार, दिलीप ढगे, गोपाल वैद्य, अरुण पडोळे, राजु बडोले, आसाराम वैद्य, यांचा समावेश होता.
धरणे आंदोलनात गजानन पाचे, मोहनलाल शिागंडे, ताराचंद देशमुख, प्रताप उके, झाडुजी वासनिक, स्वामी रविंद्र पंजाबी, अरविंद पाटील, प्रकाश रामटेके, राजु लांजेवार, ताराचंद आंबाघरे, अमित क्षिरसागर, चांगेश्वर मांढरे, देविदास कान्हेकर इत्यादींचा समावेश होता़ (नगर प्रतिनिधी)