‘किंगफिशर’ संघ विजेता
By Admin | Updated: February 12, 2016 01:22 IST2016-02-12T01:22:28+5:302016-02-12T01:22:28+5:30
चुरशीच्या अंतिम सामन्यात शेवटच्या घटकेला भंडाऱ्याच्या तरूणाई संघावर मात करीत गोंदियाच्या किंगफिशर संघाने आपले नाव नगराध्यक्ष चषकावर कोरले.

‘किंगफिशर’ संघ विजेता
नगराध्यक्ष चषक : भंडाऱ्यात तरूणाईचा जल्लोष
भंडारा : चुरशीच्या अंतिम सामन्यात शेवटच्या घटकेला भंडाऱ्याच्या तरूणाई संघावर मात करीत गोंदियाच्या किंगफिशर संघाने आपले नाव नगराध्यक्ष चषकावर कोरले. हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगलेल्या अंतिम सामन्यात दोन्ही संघाने वर्चस्व सिद्ध करण्याचे प्रयत्न केले. त्यात किंगफिशर संघ यशस्वी झाला. अनेक वर्षांनंतर भंडाऱ्यात अशाप्रकारचे क्रिकेटचे सामने भंडाराकरांना बघावयास मिळाले.
नगर परिषद भंडारा व तरूणाई सेवा फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रेल्वे ग्राऊंड, येथे करण्यात आले होते. विदर्भातील संघासह छत्तीसगड, मध्यप्रदेशचे संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात तरूणाई सेवा फाऊंडेशन भंडारा व किंगफिशर क्रिकेट संघ दाखल झाले. अंतिम सामन्यात किंगफिशर संघाने ९१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र किंगफिशरच्या गोलंदाजीपुढे फलंदाज तग धरू न शकल्याने शेवटच्या षटकात १८ धावांनी पराभव करून किंगफिशर संघाने चषक पटकावले.
सामन्यानंतर विजेत्या किंगफिशर संघाला नगराध्यक्ष बाबुराव बागडे यांच्या हस्ते नगराध्यक्ष चषक व ५१ हजार रूपयांचे प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सरिता फुंडे, मुख्याधिकारी रवींद्र देवतळे, तरूणाईचे अध्यक्ष महेंद्र निंबार्ते, सुनिल मेंढे, नरेंद्र गुर्जर, राम वझलवार, नगरसेवक जुगल भोंगाडे, माणिक गायधने, मकसूद बन्सी, शमीम शेख, राजू साठवणे, धनराज साठवणे, संध्या धनकर, कविता भोंगाडे, रूपेश टांगले उपस्थित होते.
तरूणाई संघाच्यावतीने द्वितीय पारितोषिक संघाचे कर्णधार अन्वेष मेंढे व चमूला चषक व ३१ हजार रूपयांचे बक्षीस तर तृतीय बक्षीस ११ हजार रूपयांचे तरूणाईच्या संघाला देण्यात आले.
अंतिम सामन्याचे सामनावीर विजय, स्पर्धेचे मालिकावीर भंडाऱ्याचा उमेश काकडे, उत्कृष्ट फलंदाज प्रतिक, उत्कृष्ट गोलंदाज अभीजित, एका सामन्यात भंडाऱ्याच्या आकांत सलामे या खेळाडूने ३५ चेंडूत ११७ रन झळकावले त्याला ३,१०० रूपयाचे तर तरूणाईच्या अमित गोन्नाडे याने एका सामन्यात ६ चेंडूत ६ षटकार मारल्यामुळे १,००० रूपयांचे पारितोषिक देण्यात आले. पंच म्हणून उत्कृष्ट कार्य पार पाडल्याबद्दल प्रदीप शर्मा यांचा सत्कार करण्यात आला. सामालोचनाचे कार्य निखिल यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले. (प्रतिनिधी)