टिप्पर-दुचाकी अपघातात एक ठार
By Admin | Updated: March 23, 2017 00:21 IST2017-03-23T00:21:00+5:302017-03-23T00:21:00+5:30
साकोली-लाखांदूर रस्त्यावर गिट्टी भरलेला टिप्पर बोंडगाव मार्गाकडे वळण घेत असताना..

टिप्पर-दुचाकी अपघातात एक ठार
दिघोरीतील घटना : चुकीच्या मार्गाने ओव्हरटेक जीवावर बेतले
दिघोरी (मोठी) : साकोली-लाखांदूर रस्त्यावर गिट्टी भरलेला टिप्पर बोंडगाव मार्गाकडे वळण घेत असताना डाव्या बाजूने ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नातील दुचाकी ट्रकमध्ये शिरल्याने दुचाकीवर बसलेल्या इसमाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारला सकाळी १० वाजताच्या सुमारास दिघोरी टी-पांर्इंट चौकात घडली.
सेवक परसराम वाढई (४८) रा.वडेगाव ता.सडक अर्जुनी याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दुचाकी चालक आशिष काशिनाथ पाथोडे (१८) हा जखमी झाला. नशिब बलवत्तर म्हणून आशिष बचावला. त्याला दिघोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
अड्याळ येथून गिट्टी भरून येणारा ट्रक क्रमांक एम एच ३६/ ४६४ हा दिघोरीच्या टी-पार्इंटवरून बोंडगाव मार्गे बाराभाटी (कोटा) येथे जात होता. दुचाकी क्रमांक एमएच ३५/झेड ९९१ ने साकोलीहून लाखांदूरकडे जात होते. चुकीच्या दिशेने ओव्हरटेक केल्यामुळे सदर अपघात घडल्या प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. अपघात एवढा भीषण होता की, मृतकाच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. घटनेनंतर ट्रकचालक गिरधारी राखडे याने दिघोरी पोलीस ठाण्यात जावून आत्मसमर्पण केले.
मृतदेह शवविच्छेदनासाठी लाखांदूर ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले असून तपास पोलीस हवालदार प्रकाश तलमले व आशिष ठोंबरे हे करीत आहेत. (वार्ताहर)