वृद्धाचा मारेकरी अखेर गजाआड
By Admin | Updated: August 12, 2015 00:28 IST2015-08-12T00:28:45+5:302015-08-12T00:28:45+5:30
पवनी तालुक्यातील खैरी-तैलोता येथे एका ६५ वर्षीय जैराम भोवते या वृद्धाचा निर्घृण खून करण्यात आला होता.

वृद्धाचा मारेकरी अखेर गजाआड
नरबळीचा केला होता देखावा : प्रकरण खैरी-तैलोता येथील खुनाचे
अड्याळ : पवनी तालुक्यातील खैरी-तैलोता येथे एका ६५ वर्षीय जैराम भोवते या वृद्धाचा निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी एका २५ वर्षीय तरूणाला अटक केली आहे.
संतोष लेहनदास लोणारे रा. नवेगाव (ठाणे) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना दि.३ आॅगस्ट रोजी घडली होती. घटनास्थळावरील पुराव्याच्या आधारे पोलिसांना या प्रकरणातील आरोपीला पकडण्यात यश आले.
माहितीनुसार, जैराम विठोबा भोवते हे मांढळ येथील रहिवासी होते. घटनेच्या दिवशी ते खैरी-तैलोता येथील हनुमान मंदीरासमोरील पटांगणात बसले होते.
यावेळी संतोष लोणारे हा तेथे आला. यावेळी भोवते यांनी संतोषला चहा पिण्यासाठी पाच रूपये मागितले. या क्षुल्लक कारणावरून संतोषने एका जड वस्तूने जैराम यांच्यावर प्रहार केला.
यात त्यांचा मृत्यू झाला. जैरामचा मृत्यू झाल्यामुळे आपल्यावर कुणी संशय घेऊ नये, यासाठी त्याने नरबळीचा देखावा तयार केला. त्यानंतर आरोपीने जैरामचा चेहरा विद्रूप करून अंगावरील कपडे मंदीर परिसरात नेऊन ठेवले. या वृद्धाच्या गुप्त अवयवावरही मारहाण केली.
ही घटना उघडकीस आल्यानंतर अड्याळ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. घटनास्थळाहून पुरावा मिळू नये यासाठी संतोषने स्वत:चे कपडे घटनास्थळावरील एका खड्ड्यात गठ्ठा बांधून फेकून दिला होता. प्
ोलिसांच्या शोध कार्यादरम्यान या खड्ड्यातील पाणी उपसल्यानंतर संतोषचे कपडे आढळून आले. गोपनीय माहिती आणि नागरिकांच्या चर्चेनंतर पोलिसांनी संतोषला पकडले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलीसी हिसका दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
सात दिवसात वृद्धाच्या खूनाचा तपासकार्य पुर्ण करण्यात अड्याळ येथील पोलिसांना यश आले. (वार्ताहर)
सदर घटना नरबळीची नसून त्याचा देखावा उभा करण्यात आला होता. तपास कार्यात पोलीस पाटील, वरिष्ठ अधिकारी व ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले. त्यामुळेच संतोषला अटक करण्यात यश मिळाले.
- अजाबराव नेवारे
पोलीस निरीक्षक, अड्याळ.