खुशबू बंधाटे सुदामा विद्यालयातून प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:22 IST2021-07-22T04:22:23+5:302021-07-22T04:22:23+5:30

मोहाडी : तालुक्यातील खमारी बु. या लहानशा गावातील रहिवासी खुशबू हरिश्चंद्र बंधाटे हिने मोठ्या बहिणीपाठोपाठ वर्ग दहावीमधून नव्वदच्या ...

Khushboo Bandhate first from Sudama Vidyalaya | खुशबू बंधाटे सुदामा विद्यालयातून प्रथम

खुशबू बंधाटे सुदामा विद्यालयातून प्रथम

मोहाडी : तालुक्यातील खमारी बु. या लहानशा गावातील रहिवासी खुशबू हरिश्चंद्र बंधाटे हिने मोठ्या बहिणीपाठोपाठ वर्ग दहावीमधून नव्वदच्या पुढे ९६ टक्के गुण घेऊन सुदामा विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. विकास फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष तथा माजी सभापती मोहाडी पंचायत समिती हरिश्चंद्र झगळू बंधाटे आणि आई सुशीला हरिश्चंद्र बंधाटे यांचे नाव खुशबूने उज्ज्वल केले आहे. माजी आमदार व विकास फाउंडेशनचे संस्थापक चरण वाघमारे यांच्या तुमसर येथील जनसंपर्क कार्यालयात उत्तम गुण मिळविल्याबद्दल खुशबूचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार चरण वाघमारे, माजी सभापती हरिश्चंद्र बंधाटे, सभापती भाऊराव तुमसरे, खेमराज मेश्राम, ललित शुक्ला, राजू गायधने, नागेश धार्मिक, विजय भुरे, सागर बिसने, पंकज राठोड, आरती बंधाटे आदींची उपस्थिती होते.

Web Title: Khushboo Bandhate first from Sudama Vidyalaya