खोप्यामधी खोपा सुगरणीचा खोपा...

By Admin | Updated: September 1, 2016 00:50 IST2016-09-01T00:50:00+5:302016-09-01T00:50:00+5:30

श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे... बालकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे यांच्या कवितेतील ओळी आठवायला लागतात. नदी,

Khopiyamati Khopa Sugarani Khapaa ... | खोप्यामधी खोपा सुगरणीचा खोपा...

खोप्यामधी खोपा सुगरणीचा खोपा...

विनीचा हंगाम : पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा
शिवशंकर बावनकुळे साकोली
श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे... बालकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे यांच्या कवितेतील ओळी आठवायला लागतात. नदी, नाल्या परिसरात, माळरानात भटकताना चिऽऽऽ चीऽऽऽ चीऽऽऽ असा मधूर आवाज काही पक्षी कुळे काढताना दिसतात. असा आवाज काढणारे पक्षी म्हणजे सुगरण. सुगरण पक्ष्यांना काही भागात देवचिमण्या म्हणतात. या पक्ष्यांची एकेका झाडावर २५-३० घरटी आढळून येत आहेत. या घरट्यांना देवचिमण्यांची वसाहत म्हणतात.
पाखरं म्हणजे पक्षी. कोकीळेसारखे काही पक्षी वगळता सर्वच पक्षी विणीच्या काळात घरटी बांधण्यात व्यस्त दिसतात. काही पक्षी नदीच्या बट्टीत बिळे करून त्यात आपली अंडी घालतात. काहींची झाडाच्या पोखरात तर काहींची डोंगराच्या कपारीत किंवा मोठ्या दगडांच्या आडोशाला. काहींची विद्युत खांबावर तर काहींची घरटी जुन्या दुर्लक्षित भिंतीच्या छिद्रात. काही पक्ष्यांची घरटी तणसाच्या ढिगात, काहींची घरातील फोटोच्या मागे, काही पक्ष्यांची घरटी झाडावर काटक्यांच्या सहाय्याने बांधलेली तर काही घरटी जमिनीच्या दिशेने लोंबकळणारी असतात. तर काही पाण्यात तरंगणारी.
सर्वच घरटी सुंदर नसतात. पण पक्षी जगतामध्ये सुगरण पक्ष्याची घरटी नयनरम्य आकर्षक असते. या वसाहतीत घरटी बांधण्याचे काम नर सुगरणपक्षी करताना दिसतो. बारीक चोचीने पढार, भूईशिंदी, दातेरी गवत, ऊसाचे बारीक पाते घटरी तयार करण्याकरिता वापरतो. ही घरटी तयार करताना बाभूळ, बोर, शिंदी, हिवर, अंजन, येण इत्यादी झाडांची निवड करतो. गारूड्याच्या पुंगीसारखे घरटे सुगरण नराच्या कौशल्यातून साकार होते. आपले कौशल्य, क्षमता पणाला लावून पृथ्वीच्या पाठीवर एक अद्भूत शिल्प तयार झाले की खानदेशातील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना सुगरणीच्या खोप्याबद्दल विलक्षण वेड जडले होते. घरट्याचे अप्रतीप सौंदर्य पाहून त्या म्हणाल्या,
सुगरण पक्षांमध्ये नर मादी हा भेद सहज ओळखता येतो. नर पिवळाधमक असून मादी त्यामानाने धुसर असते. नराचे डोळे पिवळे, घशाचा भाग काळा, उर्वरीत छातीचा भाग भुरकट पिवळसर असतो. पाठीवरील भाग गाव चिमण्यासारखा दिसतो. मादी सुगरणीवर पुसटशी पिवळसर झलक आढळून येते. नर हा उत्तम कारागिर आहे. घरटी बांधण्याचे सारे तंत्र त्याला विकसीत आहे.या घरट्याची लांबी तीन फुटापर्यंत असते. काही घरटी कमी जास्त लांबीची असतात.
सुंदर घरटी बांधणे, आपल्या रुपरंगामुळे माद्यांना आकर्षीत करणे आणि प्रजोत्पादन करणे एवढेच नराचे काम असल्यामुळे बहिणाबाईंनी त्याला गण्यागंप्या नर असे म्हटले आहे. नर अनेक माद्यांचा संसार चालवत असल्यामुळे त्याला बायकांचा दादला असा अर्थ लेखक विनोद भोवते यांना अभिप्रेत आहे. मादी सुगरणी मोठ्या चतूर असतात. नराने बांधलेली घरटी आकर्षक, मजबूत आणि संसार थाटण्याजोगे आहेत की नाही याची खात्री करतात. घरट्याचे बाह्यांग, अंतरंग तपासून झाले की योग्य अयोग्य या गोष्टींचा विचार करूनच घरट्याला पसंत करतात आणि नर आपले पिवळे धमक रुप माद्यांसमोर प्रकट करतो. माद्या नराच्या नादी लागतात. ज्या नराचे घरटे आकर्षक, दर्जेदार नसते त्यांच्या नादी माद्या लागतात. दिसून येत नाही. त्यांना कौशल्य वापरून कामाला लागावे लागते. हा सारा खेळ विणीच्या काळात पाहायला मिळतो.
खोपा इनला इनला,
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देखरे माणसा
असे सुगरण घरट्याकडे पाहून वाटते.

Web Title: Khopiyamati Khopa Sugarani Khapaa ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.