शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

खरिपाचा धान केंद्रातच पडून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:01 IST

भंडारा जिल्ह्यात सुमारे ३२ लक्ष १० हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली. ८९ धान खरेदी केंद्र अंतर्गत जिल्ह्यातील धान खरेदी केल्या गेली. खरेदीच्या तुलनेत डीओच्या माध्यमाने धानाची भरडाईसाठी उचल होऊ न शकली नाही. त्यामुळे गोदाम व त्याच्या बाहेर धान पडून आहेत. काही ठिकाणचे धान बाहेरचे उचलल्या गेले तर काहींचे गोदामात अर्ध्याच्यावर शिल्लक आहेत.

ठळक मुद्देउन्हाळीची खरेदी अशक्यच : नोव्हेंबर महिन्यापासून खरिपाचा धान आजही गोदामातच

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरातील हमी धान खरेदी केंद्र उन्हाळी धान खरेदी करण्यासाठी असक्षम दिसत आहेत. गोदामाची व्यवस्था अपुरी असल्याने व खरिपातील धान आजही गोडाऊनमध्ये पडला असल्याने पुढची खरेदी प्रभावित झालेली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.पालांदूर परिसरात पालांदूर, मेंगापूर, जेवनाळा, देवरी, मुरमाडी आदी ठिकाणी खरिपाची धान खरेदी करण्यात आली. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून धान खरेदीला आरंभ होत सुमार धान खरेदी करण्यात आली. शासनाने बोनस जाहीर केल्याने धान खरेदीचा आकडा प्रशंसनीय ठरला.भंडारा जिल्ह्यात सुमारे ३२ लक्ष १० हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली. ८९ धान खरेदी केंद्र अंतर्गत जिल्ह्यातील धान खरेदी केल्या गेली. खरेदीच्या तुलनेत डीओच्या माध्यमाने धानाची भरडाईसाठी उचल होऊ न शकली नाही. त्यामुळे गोदाम व त्याच्या बाहेर धान पडून आहेत. काही ठिकाणचे धान बाहेरचे उचलल्या गेले तर काहींचे गोदामात अर्ध्याच्यावर शिल्लक आहेत. पालांदूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अंतर्गत असलेल्या गोडाऊनमध्ये सुमारे ३३ हजार क्विंटल धान उचल अभावाने शिल्लक आहे. भगीरथ सहकारी भात गिरणी मुरमाडी अंतर्गत ८६०० क्विंटल धान गोदामात पडून आहे. तसेच इतरही धान खरेदी केंद्रात कमी-जास्त प्रमाणामध्ये धान शिल्लक असल्याने उन्हाळी धान खरेदी करण्याचा प्रश्न खरेदी केंद्रापुढे आवासून उभा आहे.शासन-प्रशासन उन्हाळी धान खरेदी करण्याकरिता खरेदी केंद्रांना वारंवार सूचना देत दबाव वाढवत असताना शिल्लक असलेल्या मालाची उचल करण्याकडे अपेक्षित लक्ष देत नाही. त्यामुळे धान खरेदी केंद्रधारक संकटात सापडलेली आहेत. शेतकरीसुद्धा दररोज धान खरेदी केंद्रधारकांना विचारणा करीत, धान खरेदी केंद्र शेतकऱ्यांसाठी की व्यापाऱ्यांसाठी अशी विचारणा रोजच वाढत चाललेली आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनने अपेक्षित हजेरी लावल्यास शेतकºयांचे हजारो पोती धान मोजणीच्या प्रतीक्षेत असलेली प्रभावित होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. शासन व प्रशासन स्तरावरून शेतकºयांचा विचार करून तत्काळ गोदाामधील खरिपाच्या धानाला उचल देत नव्याने उन्हाळी धान खरेदी करिता सहकार्य करण्याची मागणी केली जात आहे.उन्हाळी धान खरेदीसाठी शेतकºयांचे रोजच विचारणे वाढलेले आहे. आमच्याकडे सुमारे ३३ हजार क्विंटल धान खरिपाचा अजूनही शिल्लक असल्याने व आमच्याकडे दुसºया गोडाऊनची व्यवस्था नसल्याने धान खरेदी सुरु करणे आम्हाला शक्य वाटत आहे. धानाची उचल वेगाने झाल्यास शक्य तितक्या लवकर उन्हाळी हंगामाचे धान खरेदी करण्यात येतील.- सुनील कापसे,गटसचिव, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पालांदूर.

टॅग्स :Farmerशेतकरी